दिवसाची सुरुवात होतेय एका खास दिवसाने ते म्हणजे, 10 सप्टेंबर. आजचा दिवस फक्त तारखेपुरता मर्यादित नाही, तर इतिहासात, विज्ञानात, आणि व्यक्तिमत्त्वांच्या जीवनात अनेक महत्त्वाच्या घटनांशी जोडलेला आहे. या दिवशी जन्मलेले, कार्य केलेले आणि इतिहासात ठसा उमठवलेले लोक आपल्या प्रेरणादायी गोष्टींसाठी ओळखले जातात. चला तर मग, 10 सप्टेंबर दिनविशेषाची थोडक्यात माहिती पाहूया.
10 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना
- 1846: एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट.
- 1898: ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची लुइगी लुकेनीने हत्या केली.
- 1936: प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित.
- 1939: कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.(दुसरे महायुद्ध)
- 1943: जर्मन फौजांनी रोम ताब्यात.(दुसरे महायुद्ध)
- 1966: पंजाब राज्याचे विभाजन, पंजाब व हरियाणा दोन राज्ये अस्तित्वात.
- 1967: जनमत चाचणी मध्ये जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय .
- 1975: व्हायकिंग-२,अमेरिकन मानवविरहित अंतराळयान, मंगळ ग्रहाकडे.
- 1996: गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर , व पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.
- 2001: मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील(Who wants to be a millionaire), कौन बनेगा करोडपती ही स्पर्धा जिंकली.
- 2002: स्वित्झर्लंड युनायटेड नेशन्समध्ये सामील.
- 2022: फिलिप आर्थर जॉर्ज यांना युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स (तिसरा) म्हणून घोषित केले.
10 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1872: कसोटी क्रिकेट खेळाडू, महाराजा के. एस. रणजितसिंह. यांच्या स्मरणार्थ 1934 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू.
- 1887: गोविंद वल्लभ पंत
- (स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री)
- 1892: नोबेल पारितोषिक विजेता आर्थर कॉम्प्टन (अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ)
- १८९५: विश्वनाथ सत्यनारायण
- (कविसम्राट तेलुगू लेखक)
- 1912: बी. डी. जत्ती
- (भारताचे ५वे उपराष्ट्रपती, ५ महिनेे हंगामी राष्ट्रपती)
- 1948: भक्ती बर्वे (नाट्य, चित्रपट अभिनेत्री)
- 1989: मनीष पांडे (भारतीय क्रिकेटपटू)
- 1941: गुंपेई योकोई (जपानी गेम डिझायनर, गेम बॉयचे निर्माते)
- 1940: जिम हाइन्स (१००-मीटर स्प्रिंट पाळण्याच्या शर्यतीमध्ये ९.९५ सेकंद वेळेसह, ‘दहा-सेकंदचा अडथळा’ पार करणारे पहिले धावपटू)
- 1932: शेखर जोशी (भारतीय लेखक)
- 1923: ग्लेन पी. रॉबिन्सन (सायंटिफिक अटलांटा कंपनीचे सह-संस्थापक, अमेरिकन उद्योगपती)
- 1839: आयझॅक के फंक
- (फंक आणि वॅगनाल्सचे सह-संस्थापक)
- 1423: एलेनॉर (अस्तुरिया देशाची राजकुमारी)
10 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 210: इ.स.पू. : किन शी हुआंग
- (चीनचे पहिले सम्राट)
- 1900: रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले.
- (महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक)
- 1923: चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता सुकुमार रॉय (बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक)
- 1948: फर्डिनांड (बल्गेरियाचा राजा)
- 1964: श्रीधर पार्सेकर (व्हायोलिन वादक)
- 1975: नोबेल पारितोषिक विजेते जॉर्ज पेजेट थॉमसन (भौतिकशास्त्रज्ञ)
- 1983: नोबेल पारितोषिक विजेते फेलिक्स ब्लॉक (स्वीस भौतिकशास्त्रज्ञ)
- 2000: झैब-अन-नसीसा हमीदल्ला (भारतीय-पाकिस्तानी पत्रकार, लेखक)
- 2006: टॉफाहाऊ टुपोऊ (टोंगाचा राजा)
- 2022: पद्म भूषण बी. बी. लाल (भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खाते महासंचालक)
- 2019: स्टेफानो देल्ले चिआई (इटालियन कार्यकर्ता, नॅशनल व्हॅनगार्डचे संस्थापक)
- 1979: अँगोलांनो नेटो (अँगोला देशाचे पहिले राष्ट्रपती)
विशेष दिवस (Special Day)
- वर्ल्ड सुसाइड प्रिव्हेंशन डे (World Suicide Prevention Day): दरवर्षी 10 सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि आत्महत्येची प्रतिबंध करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
- गिब्राल्टर नॅशनल डे (Gibraltar National Day): गिब्राल्टरमधील लोक ब्रिटिश सार्वभौमत्वाच्या समर्थनार्थ 10 सप्टेंबरला हा दिवस साजरा करतात.




