मित्रांनो इतिहासाच्या पानांवर काही दिवस असे कोरलेले असतात की ज्यांनी जगाच्या वाटचालीला नवा वळण दिलं. विज्ञान असो, राजकारण असो किंवा क्रीडा, 20 ऑगस्ट हा दिवस जगभरात अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार ठरलेला आहे. डासांमुळे मलेरियाचा प्रसार होतो हा महत्त्वपूर्ण शोध, ब्राह्मो समाजाची स्थापना, राजीव गांधींचा जन्म, तसेच भारताला जागतिक पातळीवर गौरव मिळवून देणाऱ्या क्रीडा कामगिरी हे सगळं एकाच दिवशी घडलेलं. त्यामुळे २० ऑगस्ट हा दिवस फक्त दिनदर्शिकेतला ( 20 August Dinvishesh) एक साधा दिवस नसून इतिहास, संस्कृती, विज्ञान आणि प्रेरणा यांचा संगम आहे.

20 ऑगस्ट महत्त्वाच्या घटना

  • 1966 -शिवाजी महाराजांनी दख्खन मधील नरवीर घाटी खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.
  • 1828 – ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली.
  • 1897 – सर रोनाल्ड रॉस यांनी भारतामध्ये हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
  • 1914 – पहिल्या महायुद्धात जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतलेला.
  • 1920 – मध्ये पहिले व्यावसायिक रेडिओ स्टेशन अमेरिकेमधील डेट्रॉईट शहरांमध्ये सुरू झाले.
  • 1960 – मालीपासून स्वतंत्र असल्याची घोषणा सेनेगलने केली.
  • 1988 – आठ वर्षाच्या युद्धानंतर इराक इराण युद्धबंदी करार करण्यात आला.
  • 1995 – फिरोजाबाद येथे रेल्वेच्या अपघातामध्ये 258 जण मृत्युमुखी पडले.
  • 2008 – बीजिंग ऑलिंपिक मध्ये भारताचे कुस्तीगीर सुशील कुमार यांना कांस्यपदक मिळालेले.
  • 1947 – हैदराबाद संस्थानातील स्टेट काँग्रेस ने लोकशाही राज्य स्थापनेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले.
  • 1965 – भारताने पहिल्यांदाच स्वदेशी बनवलेली INS Khukri (फ्रिगेट जहाज) नौदलात दाखल झाले.
  • 1982 – हिंदी चित्रपटसृष्टीतला गाजलेला चित्रपट बेताब प्रदर्शित झाला.
  • 1991 – प्रसिद्ध गायक पं. भीमसेन जोशींना भारतरत्न जाहीर करण्यात आला.
  • 2004 – अथेन्स ऑलिंपिकमध्ये भारताचा नेमबाज राज्यवर्धन सिंग राठोड यांनी रौप्यपदक जिंकून भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली.
  • 2016 – रियो ऑलिंपिकमध्ये पी. व्ही. सिंधू यांनी बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले.

20 ऑगस्ट रोजी जन्म झालेल्या व्यक्ती

  • 1833- बेंजामिन हॅरिसन (अमेरिकेचे 33 वे राष्ट्राध्यक्ष)
  • 1888- टन डक थांग (व्हिएतनाम देशाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष)
  • 1896- कोस्त पाल (भारतीय फुटबॉल खेळाडू)
  • 1913- राॅजर वोल्काॅट स्पेरी (अमेरिकन न्यूरोलॉजिस्ट व न्यूरो बायोलॉजिस्ट)
  • 1934-आर्मी कुसेला (फिनिश अमेरिकन मॉडेल, पहिल्या मिस युनिव्हर्स)
  • 1936-नोबेल पुरस्कार विजेते हिदेकी शिरकाव (जपानी रसायनशास्त्र व अभियंते)
  • 1940-रेक्स सेल्स (भारतीय ऑस्ट्रेलिया क्रिकेटर)
  • 1944-राजीव गांधी (भारताचे माजी पंतप्रधान)
  • 1946-एन. आर. नारायण मूर्ती (इन्फोसिसचे सहसंस्थापक)
  • 1919-डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे (स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानी)
  • 1966-एनरीको लेटा (इटली देशाचे 55 वे पंतप्रधान, वकील, राजकारणी)
  • 2003-प्रिन्स गॅब्रिएल (बेल्जियम देशाचे राजकुमार)

20 ऑगस्ट रोजी निधन झालेल्या व्यक्ती

  • 1882-जेम्स व्हाईट (तस्मानिया या देशाचे 6वे प्रीमियर स्कॉटिश ऑस्ट्रेलियन राजकारणी)
  • 1915-नोबेल पुरस्कार विजेते पाॅल एर्लिच (जर्मन चिकित्सक)
  • 1917-एडाॅल्फ फाॅन बायर (जर्मन रसायन शास्त्र)
  • 1961-नोबेल पुरस्कार विजेते पर्सि विलियम्स ब्रिजमन अमेरिकन (भौतिकशास्त्र)
  • 1971-रशीद मिन्हास (पाकिस्तानी लेफ्टनंट व पायलट)
  • 1984-रघुवीर भोपळे (सुप्रसिद्ध जादूगर)
  • 1985-हरचंद सिंग लोंगोवाल (अकाली दलाचे अध्यक्ष)
  • 1988-माधवराव शिंदे (चित्रपट, निर्माते, दिग्दर्शक)
  • 1997-प्रागजी डोस्सा (गुजराती नाटककार, लेखक)
  • 2000-प्राणलाल मेहता (चित्रपट निर्माते)
  • 2001-एम. आर. यार्दी (प्राच्यविद्येचेअभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष)
  • 2011-राम शरण शर्मा (भारतीय इतिहासकार)
  • 2012-डोम मिंटॉफ (माल्टा देशाचे ८वे पंतप्रधान, पत्रकार आणि राजकारणी)
  • 2012-मेलेस झेनावी (इथिओपिया देशाचे पंतप्रधान, सैनिक आणि राजकारणी)
  • 2013-डॉ. नरेंद्र दाभोलकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती संस्थापक, विचारवंत, साधना साप्ताहिक संपादक)
  • 2013-जयंत साळगावकर (ज्योतिर्भास्कर, लेखक, उद्योजक)2014-बी. के. अय्यंगार (भारतीय योग प्रशिक्षक, लेखक,आयंगर योगा चे निर्माते)
  • 2022-समर बॅनर्जी (भारतीय ऑलिम्पिक फुटबॉलपटू)
  • 2022-ऑस्टॅथिओस पॅथ्रोस (भारतीय सिरियाक ऑर्थोडॉक्स प्रीलेट)
  • 2022-सिब्ते रझी (भारतीय राजकारणी, खासदार सय्यद)

विशेष दिवस (Special Day)

World Mosquito Day (जागतिक डास दिवस) सर रोनाल्ड रॉस यांनी 1897 मध्ये मलेरियाचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

मित्रांनो इतिहास सांगतो की, प्रत्येक दिवस काही ना काही वेगळं शिकवून जातो. 20 ऑगस्ट हा दिवस विज्ञानातल्या क्रांतिकारक शोधांचा, सामाजिक सुधारणांचा, स्वातंत्र्यलढ्याचा, कलेचा आणि क्रीडाक्षेत्रातील प्रेरणादायी क्षणांचा साक्षीदार आहे. या दिवशी जन्मलेल्या आणि निधन झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या कार्यातून जगावर अमिट छाप सोडली आहे. त्यामुळे आपणही या दिनविशेषातून प्रेरणा घेऊन, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस अर्थपूर्ण आणि सर्जनशील बनवण्याचा संकल्प करूया. कारण इतिहास घडतो, पण भविष्य घडवण्याची ताकद आपल्या हातात आहे.