कधी तुम्ही विचार केला आहे का, एखाद्या साध्या तारखेच्या पानामध्ये किती गुपितं रहस्य दडलेली असतात? 23 ऑगस्ट ही त्यापैकीच एक तारीख आहे. या दिवशी एकीकडे जगाने गुलामगिरीविरुद्ध बंड पाहिलं, तर दुसरीकडे विज्ञानाने चंद्रावरून पृथ्वीचं पहिलं छायाचित्र टिपलं. भारताने अमेरिकेला पेटंटच्या लढाईत हरवलं, तर कवी, कलाकार आणि नेत्यांनी जन्म घेऊन इतिहास समृद्ध केला. म्हणजेच 23 ऑगस्ट हा दिवस हा फक्त कॅलेंडरवरील आकडा नाही, तर संघर्ष, प्रेरणा आणि यशोगाथांनी भरलेलं पान आहे.

हे वाचा

23 ऑगस्ट महत्त्वाच्या घटना

  • १८३९ : ब्रिटिशांनी हाँगकाँगचा ताबा घेतला.१९१४ : पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले.
  • १९४२ : मो. ग. रांगणेकर यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग.
  • १९४२ : दुसऱ्या महायुद्धात स्टालिनग्राडची ऐतिहासिक लढाई सुरू.
  • १९६६ : लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित यानाने चंद्रावरून पृथ्वीचे पहिले छायाचित्र घेतले.
  • १९९० : आर्मेनिया स्वतंत्र झाला.
  • १९९१ : वर्ल्ड वाईड वेब सर्वसामान्यांसाठी खुला झाला.
  • १९९७ : भारताने हळदीच्या पेटंटविरोधात अमेरिकेवर ऐतिहासिक विजय मिळवला.
  • २००५ : कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार.
  • २०११ : लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेतून बाहेर.

23 ऑगस्ट रोजी जन्म झालेल्या व्यक्ती

  • १७५४ : राजा लुई सोळावा (फ्रान्स).
  • १८५२ : राधा गोबिंद कार (भारतीय वैद्य, दानकर्ते).
  • १८७२ : तांगुतुरी प्रकाशम (भारतीय राजकारणी, स्वातंत्र्यसैनिक).
  • १९१८ : कविवर्य विंदा करंदीकर (ज्ञानपीठ विजेते कवी).
  • १९२४ : रॉबर्ट सोलो (नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ).
  • १९३१ : हॅमिल्टन स्मिथ (नोबेल विजेते सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ).
  • १९३३ : रॉबर्ट कर्ल (नोबेल विजेते रसायनशास्त्रज्ञ).
  • १९४४ : सुप्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानू.
  • १९६८ : गायक कृष्णकुमार कुन्नाथ (केके).
  • १९७३ : अभिनेत्री मलायका अरोरा.

23 ऑगस्ट रोजी निधन पावलेल्या व्यक्ती

  • १८०६ : चार्ल्स कुलॉम (प्रसिद्ध फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ).
  • १९७१ : मराठी व हिंदी चित्रपटातील नावाजलेली अभिनेत्री हंसा वाडकर.
  • १९७५ : पं. विनायकराव पटवर्धन (शास्त्रीय गायक व संगीतप्रसारक).
  • १९९४ : आरती साहा (इंग्लिश खाडी पोहणारी पहिली भारतीय महिला).
  • १९९७ : जॉन केंद्रू (नोबेल विजेते बायोकेमिस्ट).
  • २०१६ : रेनहार्ड सेल्टन (नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ).
हे वाचा

विशेष दिवस (Special Day)

आंतरराष्ट्रीय गुलाम व्यापार व त्याच्या निर्मूलनाचा दिवस

युनेस्कोने घोषित केलेला हा दिवस गुलामगिरीविरोधी संघर्षाला आदरांजली अर्पण करतो. १७९१ मध्ये हॅती येथे गुलामांनी केलेल्या बंडाच्या स्मृतीत हा दिवस साजरा केला जातो.

युरोपियन स्मृती दिन (Black Ribbon Day)

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर १९३९ साली झालेल्या Molotov–Ribbentrop Pact ची आठवण ठेवून नाझीवाद व स्टॅलिनवादाच्या बळी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

23 ऑगस्ट हा दिवस म्हणजे इतिहास, विज्ञान, साहित्य आणि स्वातंत्र्यलढ्याचा संगम आहे. गुलामगिरीविरोधी आवाज असो, की वेबद्वारे जगाला जोडणारा क्रांतिकारक क्षण या दिवशी घडलेल्या घटना आजही आपल्याला नवा उर्जा देतात. प्रत्येक वर्षी येणारा हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की, भूतकाळातील संघर्ष आणि यशाच्या कहाण्यांतूनच भविष्याचा मार्ग उजळतो. म्हणूनच 23 ऑगस्ट हा फक्त दिनविशेष नाही, तर प्रेरणांचा खजिना आहे. जो आपल्याला ‘इतिहास शिकून भविष्य घडवू या’ अशी हाक देत असतो.