मित्रांनो तुमचं स्वप्न इंजिनियर बनण्याचं आहे, पण आर्थिक अडचणीमुळे कॉलेजचं नाव घेताना मनात शंका येते? काळजी करू नका. AICTE Pragati Scholarship मुलींसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे. आता शिक्षणच नाही, तर तुमची प्रगतीही सरकार सांभाळणार. दरवर्षी 50,000 रुपयेची आर्थिक मदत, महाविद्यालयापासून लॅपटॉपपर्यंत सर्व खर्चासाठी तुमचं करिअर थांबू देऊ नका प्रगतीची नवीन दारं उघडा.

हे वाचा

AICTE Pragati Scholarship 2025: मुलींसाठी 50,000 रुपयेची शिष्यवृत्ती संपूर्ण माहिती

विभागतपशील
स्कॉलरशिप नावAICTE Pragati Scholarship for Girls
उद्दिष्टतांत्रिक शिक्षणात मुलींचा सहभाग वाढवणे व आर्थिक मदत देणे
लाभार्थीAICTE मान्यताप्राप्त संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुली
शिष्यवृत्ती रक्कम50,000 रुपये प्रति वर्ष
कोर्स प्रकारDiploma आणि Degree
कालावधीDegree: 4 वर्षे, Diploma: 3 वर्षे
कुटुंबाचे उत्पन्न8 लाखांपर्यंत प्रति वर्ष
इतर मर्यादाएका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुली पात्र
अर्ज पद्धतNational Scholarship Portal (NSP) द्वारे Online
रक्कम जमा पद्धतथेट DBT द्वारे बँक खात्यात

AICTE Pragati Scholarship म्हणजे काय?

AICTE Pragati Scholarship ही भारत सरकारची योजना आहे जी तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी बनवली आहे. डिप्लोमा आणि डिग्री कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत देण्याचा याचा उद्देश आहे. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांची प्रगती सुनिश्चित करणे हा मुख्य हेतू आहे.

स्कीमचे उद्दिष्ट काय आहे?

या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट म्हणजे तांत्रिक शिक्षणात मुलींचा सहभाग वाढवणे, आर्थिक अडचणीमुळे शिक्षण सोडण्याची वेळ येऊ न देणे आणि महिलांना तंत्रज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रात सक्षम बनवणे. समाजात महिलांचे कौशल्य आणि रोजगाराच्या संधी वाढवून राष्ट्रनिर्माणात योगदान वाढवणे हा हेतू आहे.

शिष्यवृत्ती रक्कम काय आहे?

या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थिनींना प्रति वर्ष 50,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. ही रक्कम फी, पुस्तके, इंटरनेट, लॅपटॉप, सॉफ्टवेअर आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी वापरता येते. Hostel आणि मेडिकल खर्चासाठी ही रक्कम लागू नाही. रक्कम थेट विद्यार्थिनिच्या बँक खात्यात जमा होते.

हे वाचा

पात्रता अटी काय आहेत?

अर्जदार मुलगी असणे आवश्यक आहे आणि तिने AICTE मान्यताप्राप्त संस्था/कॉलेजमध्ये प्रथम वर्ष किंवा लेटरल एंट्रीने दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतलेला असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातून जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळतो.

कोर्स कालावधी व मदत कालावधी

डिग्री विद्यार्थिनींना जास्तीत जास्त 4 वर्षे आणि डिप्लोमा विद्यार्थिनींना 3 वर्षे शिष्यवृत्ती मिळते. लेटरल एंट्रीने प्रवेश घेतल्यास उर्वरित वर्षांसाठी मदत दिली जाते. प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थिनीने आवश्यक गुण आणि उपस्थिती निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे काय आहेत?

अर्ज करताना आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), प्रवेश पत्र, मार्कशीट, आणि संस्थेचे सत्यापन पत्र आवश्यक आहे. सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि वैध असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.

अर्ज प्रक्रिया काय आहे?

  • अर्ज National Scholarship Portal (NSP) वर ऑनलाइन करावा लागतो.
  • प्रथम नोंदणी करून लॉगिन करावे, नंतर “AICTE Pragati Scholarship” निवडून फॉर्म भरावा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट केल्यानंतर कॉलेज व संबंधित अधिकारी व्हेरिफिकेशन करतात.
  • अंतिम मंजुरीनंतर निधी थेट खात्यात येतो.

निवड प्रक्रिया काय आहे?

ही शिष्यवृत्ती पूर्णपणे Merit-Based आहे. विद्यार्थिनींच्या प्रवेशाच्या गुणांवर आधारित निवड केली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय मुलींना विशेष प्राधान्य दिले जाऊ शकते. सर्व कागदपत्रे योग्य असल्यास आणि अटी पूर्ण केल्यास शिष्यवृत्ती मंजूर होते.

हे वाचा

AICTE Pragati Scholarship Merit List 2024-25 (Degree & Diploma) – Download PDF

CategoryAcademic YearDownload Link
Pragati Scholarship Merit List (Degree)2024-2025click here
Pragati Scholarship Merit List (Diploma)2024-2025click here

AICTE Pragati Scholarship 2025

महत्वाची लिंकURL
Apply Online / NSP Portalclick here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..