Bharti Airtel Scholarship 2025: भारती एअरटेल फाऊंडेशनने 2024 मध्ये एक भव्य शिष्यवृत्ती योजना सुरू केली होती, जी आता 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी देखील लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ₹100 कोटींच्या निधीतून देशभरातील गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत केली जात आहे.

विशेष म्हणजे, या योजनेत मुलींना प्राधान्य देण्यात येत असून, विद्यार्थ्यांना 100% फी माफी, हॉस्टेल आणि जेवणाच्या खर्चाची पूर्तता कंपनी द्वारे केली जाणार आहे. तसेच, प्रथम वर्षात लॅपटॉप देखील मोफत दिला जाणार आहे.

Airtel Scholarship Yojana शिष्यवृत्ती योजनेचे उद्दिष्ट

“वंचित पार्श्वभूमीतील विदयार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्य घडवण्याची संधी उपलब्ध करून देणे” असे योजनेचे मुख्य ध्येय आहे.

भारती एअरटेल टेक्नॉलॉजी शिष्यवृत्ती योजना

लाभमाहिती
वार्षिक फी100% फी शिष्यवृत्तीतून भरली जाईल (युनिव्हर्सिटी स्ट्रक्चरप्रमाणे)
हॉस्टेल व मेस शुल्कपूर्णतः भरली जाईल (जास्तीत जास्त युनिव्हर्सिटीच्या दरानुसार)
लॅपटॉपपहिल्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला लॅपटॉप दिला जाईल
कालावधीUG व 5 वर्षांचे इंटिग्रेटेड कोर्सेस – पूर्ण कालावधीसाठी
फिनिशिंग कमिटमेंटशिक्षण पूर्ण झाल्यावर एक विद्यार्थ्याला शैक्षणिक सहाय्य देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल.

भारती एअरटेल शिष्यवृत्ती योजना पात्रता (Eligibility)

  • भारती एरटेल शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .
  • 2025-26 साठी अभियांत्रिकी / किंवा 5 वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स प्रवेश निश्चित असावा
  • कोर्सेस: Electronics & Communication, Telecom, IT, CS, Data Science, Aerospace, AI, ML, Robotics, AR/VR, IoT
  • NIRF 2024 मध्ये टॉप 50 अभियांत्रिकी संस्थांमधून प्रवेश घेतलेला असावा
  • कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹8.5 लाखांपेक्षा कमी असावे
  • खालील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल: मुली, दिव्यांग, एक पालक / पालक नसलेले
  • कोणतीही दुसरी शिष्यवृत्ती (same purpose साठी) घेतलेली नसावी

Document Verification कागदपत्रे पडताळणी

Airtel Scholarship 2025 Document Requirenments

  • आधार कार्ड)
  • चालू वर्षाचा प्रवेश (प्रवेश पत्र, विद्यापीठ/संस्थेचे शुल्क पत्र) 
  • बारावीची गुणपत्रिका
  • जेईई स्कोअरकार्ड किंवा विद्यापीठ प्रवेश परीक्षेचा स्कोअरकार्ड
  • पालक/पालकांच्या उत्पन्नाची कागदपत्रे:
    • जर पगारदार असेल तर – नवीन आयकर रिटर्न फॉर्म आणि मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
    • जर करपात्र उत्पन्न नसेल तर – सरकारने जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र आणि मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
  • अर्जदाराचे आणि पालकांचे गेल्या ६ महिन्यांचे बँक खाते तपशील (जसे की खाते क्रमांक, आयएफएससी, शाखेचा पत्ता)
  • संस्थेचे बँक खाते तपशील
  • अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
  • अर्जदाराकडून उद्देशाचे विधान (SOP)

निवड प्रक्रिया (Airtel Scholarship 2025 Selection Process)

अर्ज स्वीकारल्यानंतर, भारती एअरटेल फाउंडेशन निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांची विविध टप्यांमध्ये निवड करते. यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच, आर्थिक गरज आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीचा महत्वाने विचार केला जातो. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ‘भारती स्कॉलर्स’ (Bharti Scholars) अशी ओळख मिळते.

मागील वर्षातील 2024-25 मधील आकडेवारी

भरती एरटेल ने हि योजना मागील वर्षापासून सुरु केली होती त्यानुसार ऐकून 276 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आणि यामध्ये 22% म्हणजेच 62 मुली विद्यार्थिनी पात्र ठरल्या.

Important Note

JOSAA फी, लायब्ररी डिपॉझिट, इंटरनेट फी, नुकसान भरपाई इ. छोट्या खर्चांसाठी शिष्यवृत्तीत कव्हर नसतो – ते विद्यार्थ्यांनाच भरावे लागतील.

जर Airtel Scholarship 2025 साठी कोणतीही चुकीची माहिती पुरवली गेली असेल, तर शिष्यवृत्ती रद्द केली जाईल आणि सर्व रक्कम परत मागवली जाईल.

दिलेला लॅपटॉप हरवला किंवा खराब झाला, तर त्याची जबाबदारी विद्यार्थ्याचीच असेल.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा?

Airtel Scholarship 2025: शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अधिकृत संकेतस्थळावरून (Bharti Airtel Foundation) वर अर्ज सादर करून अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे, प्रवेशाचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी अपलोड करणे आवश्यक असेल.

Airtel Scholarship 2025 Apply Now-

Apply Now

भारती एअरटेल स्कॉलरशिप योजना 2025 ही एक सुवर्णसंधी आहे, जी केवळ आर्थिक मदत करत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये “शिक्षणाची भावना” निर्माण करते. टेक्नॉलॉजी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी ह्या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..