मित्रांनो देशासाठी काहीतरी मोठं करायचं आहे का? मग फक्त डॉक्टर म्हणून, पेशंट्सचं उपचार न करता, थेट भारतीय लष्कराचा भाग बनून राष्ट्रसेवेत योगदान देण्याची सुवर्णसंधी आली आहे. इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स भरती 2025 अंतर्गत दंतचिकित्सकांना अधिकारी म्हणून सैन्यात सामील होण्याची संधी मिळणार आहे. या भरतीमुळे तुम्ही फक्त “Doctor” राहणार नाही, तर “Army Officer” होऊन देशसेवेचा मानही मिळवणार आहात. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.
Army Dental Corps Recruitment 2025 : डॉक्टर ते आर्मी ऑफिसर बनण्याची सुवर्णसंधी
| तपशील | माहिती |
|---|---|
| भरतीचे नाव | Indian Army Dental Corps Bharti 2025 |
| पदाचे नाव | Short Service Commission (SSC) Dental Officer |
| एकूण पदे | 30 |
| अर्ज प्रक्रिया सुरू | 18 ऑगस्ट 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 17 सप्टेंबर 2025 |
| शुल्क | 200 रुपये (सर्व उमेदवारांसाठी) |
| शैक्षणिक पात्रता | BDS/MDS (DCI मान्यताप्राप्त), BDS मध्ये किमान 55% गुण, 1 वर्ष इंटर्नशिप |
| अत्यावश्यक परीक्षा | NEET (MDS) 2025 पास |
| Dental Registration | DCI/State Dental Council कडून 31 डिसेंबर 2025 पर्यंत वैध नोंदणी |
| वयोमर्यादा | जास्तीत जास्त 45 वर्षे (31 डिसेंबर 2025 रोजी) |
| नागरिकत्व | फक्त भारतीय नागरिक |
| निवड प्रक्रिया | NEET स्कोअर → Screening → Interview → Medical Exam |
| पगार श्रेणी | 56,100 –1,77,500 रुपये (Pay Level 10B) + भत्ते |
| अधिकृत वेबसाईट | https://join.afms.gov.in |
देशसेवेची संधी जर तुमच्या हातात आली तर ती सोडावी का? डॉक्टर म्हणून भारतीय सैन्यात सेवा करण्याची सुवर्णसंधी आता तुमच्यासमोर आहे. इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स भरती 2025 अंतर्गत Short Service Commission (SSC) Dental Officer पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीद्वारे दंतचिकित्सकांना भारतीय लष्करात अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे.
भरतीची मुख्य माहिती
या भरतीमध्ये एकूण 30 पदे उपलब्ध आहेत. अर्ज प्रक्रिया 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून 17 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. सर्व उमेदवारांना अर्जासाठी 200 रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज फक्त ऑनलाइन माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे BDS किंवा MDS पदवी असणे आवश्यक आहे. BDS उमेदवारांनी त्यांच्या अंतिम वर्षात किमान 55% गुण मिळवलेले असणे बंधनकारक आहे. तसेच 1 वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप 30 जून 2025 पूर्वी पूर्ण झालेली असावी. उमेदवाराकडे Dental Council of India किंवा State Dental Council चे Registration Certificate 31 डिसेंबर 2025 पर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
NEET परीक्षा आवश्यक
या भरतीसाठी NEET (MDS) 2025 परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. NEET MDS परीक्षा 19 एप्रिल 2025 रोजी झाली असून, या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून शॉर्टलिस्टिंग केले जाणार आहे.
वयोमर्यादा व नागरिकत्व
उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2025 रोजी जास्तीत जास्त 45 वर्षांपर्यंत असावे. तसेच ही भरती फक्त भारतीय नागरिकांसाठी खुली आहे.
निवड प्रक्रिया काय आहे?
मित्रांनो निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होईल:
- NEET MDS स्कोअरवर आधारित प्राथमिक स्क्रीनिंग
- Selection Board इंटरव्ह्यू (मुख्यत्वे दिल्ली येथे होतो)
- Medical Examination (शारीरिक व मानसिक फिटनेस तपासली जाईल)
अंतिम मेरिट लिस्ट NEET स्कोअर आणि इंटरव्ह्यू गुण यांच्या आधारे तयार होईल.
पगार व सुविधा
निवड झालेल्या अधिकाऱ्यांना 56,100 ते 1,77,500 (Pay Level 10B) इतका पगार मिळेल. याशिवाय DA, HRA, Medical सुविधा, CSD Canteen सुविधा आणि इतर अनेक सैनिकी लाभ उपलब्ध होणार आहेत. ही नोकरी फक्त पगारापुरती नाही तर देशसेवेची अभिमानाची संधी आहे.
अर्ज प्रक्रिया काय आहे?
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट join.afms.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. अर्ज भरताना जन्मतारीख पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, NEET MDS स्कोअरकार्ड, इंटर्नशिप पूर्णतेचे प्रमाणपत्र, Dental Registration प्रमाणपत्र इ. कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
| लिंक | तपशील |
|---|---|
| Official Notification PDF | click here |
| Apply Online | click here |
| Official Website | click here |
देशासाठी डॉक्टर म्हणून आपलं कौशल्य वापरण्याची संधी रोज येत नाही. इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स SSC भरती 2025 ही फक्त नोकरी नाही, तर राष्ट्रसेवेचा मार्ग आहे. येथे तुम्हाला पगार, सुविधा आणि प्रतिष्ठा तर मिळणारच आहे, पण त्याहूनही मोठं म्हणजे “मी माझ्या देशासाठी, माझ्या जवानांसाठी काम करतोय” हा अभिमान मिळणार आहे. जर तुमच्यात देशसेवेचं स्वप्न असेल, तर मित्रांनो हीच वेळ आहे उशीर करू नका, आजच अर्ज करा आणि भारतीय सैन्याचा भाग बनून आपल्या करिअरसोबत देशाचंही भविष्य उज्ज्वल करा.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा ✅ |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
| सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | येथे क्लिक करा |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.







