मित्रांनो पुण्यातील डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रोफेशनल्ससाठी सुवर्णसंधी आली आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (BAVMC Pune) येथे तब्बल 78 प्रतिष्ठित प्राध्यापक पदांची मोठी भरती जाहीर (BAVMC Pune Bharti 2025) झाली असून, अनुभव + उच्च शिक्षण असणाऱ्यांसाठी ही भरती म्हणजे करिअरमध्ये “टर्निंग पॉईंट” ठरू शकते. चांगली सरकारी नोकरी, उत्तम वेतन, आणि प्रतिष्ठेच्या वातावरणात काम करण्याची ही संधी पुन्हा लवकर येणार नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात उज्वल भविष्याची स्वप्ने बाळगणाऱ्या प्रत्येकाने ही भरती नक्की पाहावी.
ही सरकारी नोकरी पुणे शहरात असणार असून पुणे मनपा अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे Online आहे.
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अर्ज भरावा.
अर्ज भरताना शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्रे, फोटो, सही यांची योग्य नोंद करणे आवश्यक आहे.
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.