मित्रांनो आजच्या डिजिटल जगात ज्याच्या हातात कॉम्प्युटरचं ज्ञान आहे, त्याच्याच हातात भविष्यातली चावी आहे. तुम्ही 10वी किंवा 12वी नंतर लगेच करिअर सुरू करायचं ठरवलं आहे का? तर आता मोठे डिग्री कोर्स न करता फक्त काही महिन्यांच्या कॉम्प्युटर कोर्सेस ने तुम्ही बनू शकता डिजिटल एक्सपर्ट आणि मिळवू शकता मोटी कमाईची संधी. कमी फीमध्ये, कमी वेळेत आणि अधिक कमाई देणारे हे कोर्स तुम्हाला नोकरीसाठी तयारच नाही तर स्वत:चा ऑनलाइन बिझनेस सुरू करण्याची ताकद देतात. चला जाणून घेऊया असे ४ धमाकेदार कॉम्प्युटर कोर्स जे तुम्हाला “Job Ready” बनवतील.
Computer Courses After 12th: डिजिटल स्किल्स मिळवा आणि घरबसल्या करा कमाई
DCA (Diploma in Computer Applications)
DCA म्हणजे “डिप्लोमा इन कॉम्प्युटर अप्लिकेशन्स” हा कोर्स सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीचा आणि सोपा पर्याय आहे. हा कोर्स ६ महिने ते १ वर्ष इतक्या कालावधीत पूर्ण करता येतो. यात विद्यार्थ्यांना MS Office, Word, Excel, PowerPoint, Internet Usage, File Management यांसारख्या बेसिक गोष्टी शिकवल्या जातात. या कोर्सनंतर तुम्ही ऑफिस असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर, टायपिस्ट किंवा शाळांमध्ये कॉम्प्युटर टीचर म्हणून काम करू शकता. फी 5,000 ते 30,000 रुपये पर्यंत असते.
Tally ERP 9 (Accounting आणि Finance कोर्स)
जर तुम्हाला अकाउंटिंग, फायनान्स किंवा बुककीपिंगमध्ये रस असेल, तर Tally ERP 9 हा कोर्स सर्वोत्तम आहे. या कोर्समध्ये तुम्हाला GST Billing, Ledger Creation, Accounting Entries, Inventory Management, Payroll System यांसारख्या व्यावहारिक गोष्टी शिकवल्या जातात. यामुळे तुम्ही कोणत्याही कंपनीच्या अकाउंट विभागात सहज काम करू शकता. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला Account Assistant, Billing Executive, Finance Officer म्हणून संधी मिळू शकते. या कोर्सची फी अंदाजे 6,000 ते 10,000 रुपये इतकी असते.
C++ आणि Software Engineering कोर्स
C++ आणि सॉफ्टवेअर इंजिनियरिंग कोर्स त्यांच्यासाठी आहे ज्यांना प्रोग्रॅमिंगमध्ये रस आहे. या कोर्समध्ये तुम्ही C++ Language, Data Structures, Logic Building, Object-Oriented Programming यांसारख्या संकल्पना शिकता. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि अॅप डिझाईन यासाठी हे बेसिक पण प्रभावी प्रशिक्षण आहे. या कोर्सनंतर तुम्ही Software Developer, App Designer, Junior Programmer म्हणून काम करू शकता. कोर्सची फी 6,000 ते 20,000 रुपये दरम्यान असते. IT आणि टेक्निकल क्षेत्रात हा कोर्स करिअर घडवण्यासाठी मजबूत पायाभूत दगड ठरतो.
E-Business आणि Internet Security कोर्स
डिजिटल युगात ई-बिझनेस आणि सायबर सिक्युरिटीची मागणी झपाट्याने वाढत आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना Online Business Management, Website Handling, Payment Systems, Cyber Threats Protection, Data Privacy याबद्दल शिकवलं जातं. आज अनेक कंपन्या त्यांच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी अशा एक्सपर्ट्सना उच्च पगार देतात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही Cyber Security Consultant, E-Business Manager, Digital Marketing Executive म्हणून काम करू शकता. कोर्सची फी 5,000 ते 30,000 रुपये पर्यंत असते.
कॉम्प्युटर कोर्स का करावा?
कॉम्प्युटर कोर्स केल्याने विद्यार्थ्यांना कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगले करिअर मिळू शकते. आज अनेक ऑनलाइन जॉब्स, फ्रीलान्सिंग आणि वर्क-फ्रॉम-होम संधी उपलब्ध आहेत. एकदा बेसिक कॉम्प्युटर स्किल्स आल्यावर तुम्ही घरबसल्या डेटा एन्ट्री, ऑनलाइन टीचिंग, डिजिटल मार्केटिंग यांसारखी कामं करू शकता. कंपन्याही आज डिजिटल स्किल्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देतात. म्हणजेच, कॉम्प्युटर कोर्स हे तुमचं करिअर आणि कमाई दोन्ही वाढवणारे एक उत्तम साधन आहे.
कॉम्प्युटर कोर्स कुठून करावा?
हे कोर्सेस तुम्ही सरकारी आणि खासगी दोन्ही संस्थांमधून करू शकता. NIELIT (DOEACC), ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था), NSDC मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रे हे उत्तम पर्याय आहेत. त्याचबरोबर Coursera, Udemy, Skill India Portal आणि NPTEL सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही हे कोर्सेस उपलब्ध आहेत. अनेक सरकारी योजना या कोर्ससाठी आर्थिक मदत देखील देतात. योग्य संस्था आणि कोर्स निवडला, तर तुम्ही कमी कालावधीत उत्कृष्ट करिअर घडवू शकता.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..







