मित्रांनो, दर 5 वर्षांनी भारतात लाखो मतदार मतदान केंद्रावर जातात, पण या विशाल लोकशाही महोत्सवाच्या मागे काम करणाऱ्या हजारो अधिकाऱ्यांचा विचार कितीजण करतात? हे अधिकारी असतात निवडणूक आयोगाचे (Election Commission of India) लोकशाहीचे खरे रक्षक. देशभर निवडणुका पारदर्शकपणे पार पाडणाऱ्या या संस्थेत काम करणे म्हणजे फक्त नोकरी नव्हे, तर देशसेवेचा सन्मान आहे. जर तुम्हालाही सरकारी नोकरीसोबत प्रतिष्ठा, स्थिरता आणि देशसेवेचा अभिमान हवा असेल, तर निवडणूक आयोग हीच तुमच्यासाठी योग्य दिशा आहे.

हे वाचा

Election Commission Jobs 2025: निवडणूक आयोगात कशी मिळते नोकरी? जाणून घ्या सर्व माहिती आणि पगार

निवडणूक आयोगात कोणती पदे असतात?

विभाग / Categoryपदाचे नाव (Post Name)
प्रशासकीय (Administrative)सेक्शन ऑफिसर (Section Officer)
प्रशासकीय (Administrative)असिस्टंट (Assistant)
प्रशासकीय (Administrative)कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
तांत्रिक / सपोर्ट (Technical / Support)डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
तांत्रिक / सपोर्ट (Technical / Support)मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
तांत्रिक / सपोर्ट (Technical / Support)स्टेनोग्राफर (Stenographer)
तांत्रिक / सपोर्ट (Technical / Support)रिसर्च असिस्टंट / लायब्रेरियन
फील्ड / इतर (Field & Other)इलेक्टोरल असिस्टंट (Electoral Assistant)
फील्ड / इतर (Field & Other)फील्ड ऑफिसर (Field Officer)
फील्ड / इतर (Field & Other)स्टाफ कार ड्रायव्हर (Driver)
फील्ड / इतर (Field & Other)कॅंटीन स्टाफ / सहाय्यक

निवडणूक आयोगात प्रशासकीय, तांत्रिक आणि सहाय्यक अशा अनेक प्रकारच्या पदांची भरती केली जाते. प्रशासकीय विभागात सेक्शन ऑफिसर, असिस्टंट आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक यांसारखी पदं असतात. तांत्रिक किंवा सपोर्ट विभागात डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), स्टेनोग्राफर, लायब्रेरियन ही पदं येतात. तर इतर सहाय्यक पदांमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर, कॅंटीन स्टाफ, फील्ड ऑफिसर, आणि इलेक्टोरल असिस्टंट यांचा समावेश होतो. ही पदं दिल्ली मुख्यालयासह राज्य आणि जिल्हा पातळीवरही असतात.

निवड प्रक्रिया कशी असते?

  • ECI मध्ये भरती तीन पद्धतींनी केली जाते, थेट भरती, कंत्राटी नियुक्ती आणि डेप्यूटेशन.
  • थेट भरती UPSC, SSC किंवा राज्य PSC च्या माध्यमातून केली जाते, ज्यात लेखी परीक्षा, टायपिंग चाचणी आणि मुलाखत यांचा समावेश असतो.
  • कंत्राटी किंवा तात्पुरत्या पदांसाठी, जसे की फील्ड ऑफिसर किंवा निवडणूक सहाय्यक, मुलाखतीच्या आधारे भरती केली जाते. काही वरिष्ठ अधिकारी IAS, राज्य प्रशासन किंवा केंद्रीय सेवांमधून डेप्यूटेशनवर पाठवले जातात.

पात्रता आणि कौशल्य (Eligibility & Skills)

प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता असते. DEO पदासाठी पदवी आणि टायपिंग स्पीड (35 WPM) आवश्यक असते, तर MTS पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. काही पदांसाठी संगणकाचे ज्ञान, डेटा हँडलिंग, एक्सेल, आणि कम्युनिकेशन स्किल्स आवश्यक असतात. फील्ड ऑफिसर आणि इलेक्टोरल असिस्टंट पदांसाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा साधारणपणे 30 ते 35 वर्षे असते, तर SC/ST, OBC आणि अपंग उमेदवारांसाठी नियमांनुसार सूट दिली जाते.

हे वाचा

भरती कुठे आणि कधी जाहीर होते?

निवडणूक आयोगाची भरती अधिसूचना वेळोवेळी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर eci.gov.in प्रसिद्ध केली जाते. याशिवाय, BECIL, SSC, किंवा UPSC सारख्या एजन्सीद्वारेही काही पदांसाठी अर्ज मागवले जातात. उमेदवारांनी वेळोवेळी या पोर्टल्सवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

पगार किती मिळतो? (Salary Structure)

विभाग / Categoryपदाचे नाव (Post Name)पगार (Salary per month)
प्रशासकीय (Administrative)सेक्शन ऑफिसर (Section Officer)47,600 – 60,000 रुपये
प्रशासकीय (Administrative)असिस्टंट (Assistant)44,900 – 56,000 रुपये
प्रशासकीय (Administrative)कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)25,500 – 35,000 रुपये
तांत्रिक / सपोर्ट (Technical / Support)डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)23,000 – 25,500 रुपये
तांत्रिक / सपोर्ट (Technical / Support)मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)17,000 – 22,000 रुपये
तांत्रिक / सपोर्ट (Technical / Support)स्टेनोग्राफर (Stenographer)35,400 – 45,000 रुपये
तांत्रिक / सपोर्ट (Technical / Support)रिसर्च असिस्टंट / लायब्रेरियन40,000 – 50,000 रुपये
फील्ड / इतर (Field & Other)इलेक्टोरल असिस्टंट (Electoral Assistant)25,000 – 30,000 रुपये
फील्ड / इतर (Field & Other)फील्ड ऑफिसर (Field Officer)25,000 – 30,000 रुपये
फील्ड / इतर (Field & Other)स्टाफ कार ड्रायव्हर (Driver)20,000 – 22,000 रुपये
फील्ड / इतर (Field & Other)कॅंटीन स्टाफ / सहाय्यक18,000 – 20,000 रुपये

टीप:

  • सर्व पगार 7व्या वेतन आयोगानुसार (7th CPC) दिले जातात.
  • काही पदांसाठी नियुक्ती UPSC / SSC / BECIL मार्गे केली जाते.
  • निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, टायपिंग टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे होते.

निवडणूक आयोगातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाते. असिस्टंटला 44,900 ते 56,000 रुपये, सेक्शन ऑफिसरला 47,600 रुपये, डेटा एंट्री ऑपरेटरला 23,000 ते 25,500 रुपये आणि MTS पदासाठी 17,000 ते 22,000 रुपये दरम्यान पगार मिळतो. फील्ड ऑफिसर आणि इलेक्टोरल असिस्टंट (Contract) पदांसाठी पगार 25,000 ते 30,000 रुपये असतो. याशिवाय, कर्मचाऱ्यांना HRA, TA, पेन्शन, मेडिकल आणि इतर सुविधा मिळतात.

निवडणूक आयोगाचे कार्य काय असते?

भारताचा निवडणूक आयोग (Election Commission of India – ECI) हा स्वतंत्र घटनात्मक संस्थान आहे जो देशातील लोकसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडतो. याशिवाय, आयोग मतदार नोंदणी, मतदान केंद्र व्यवस्थापन, EVM-VVPAT प्रणाली, आचारसंहिता पालन आणि निवडणुकीतील तक्रारींचे निराकरण या जबाबदाऱ्या सांभाळतो. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापन, डेटा हँडलिंग आणि लोकसेवा या तिन्ही क्षेत्रांमध्ये अनुभव मिळतो.

हे वाचा

नोकरीसाठी कोणते विषय आणि ज्ञान आवश्यक आहे?

निवडणूक आयोगात नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराकडे खालील क्षेत्रातील मूलभूत ज्ञान असणे फायदेशीर ठरते.

  • संविधान आणि राजकारण (Polity & Governance)
  • कंप्यूटर बेसिक आणि डेटा मॅनेजमेंट
  • Office Management (MS Office, Excel, Typing Skills)
  • Communication Skills आणि रिपोर्ट लेखन
  • General Awareness & Current Affairs विशेषतः निवडणूक प्रक्रिया, मतदान, आणि सरकारी नियम यांबद्दल.

भरती प्रक्रिया कशी समजून घ्यावी?

ECI थेट मोठ्या प्रमाणात परीक्षा घेत नाही. त्याऐवजी ती SSC, UPSC, किंवा Deputation Basis या माध्यमातून भरती करते.

उदा.

Data Entry Operator / Assistant पदासाठी: SSC (Staff Selection Commission) मार्फत परीक्षा घेतली जाते.
Administrative Officer / Section Officer पदासाठी: UPSC किंवा Deputation द्वारे नियुक्ती होते.
Contract Based पदे: BECIL, NSIC किंवा इतर अधिकृत एजन्सीद्वारे तात्पुरत्या स्वरूपात घेतली जातात.

त्यामुळे उमेदवारांनी या एजन्सींच्या वेबसाइट्स नियमित तपासाव्यात.

निवडणूक आयोगात कामाचे वातावरण कसे असते?

  • ECI मध्ये कामाचे वातावरण अत्यंत प्रोफेशनल, सुरक्षित आणि शिस्तबद्ध असते.
  • निवडणूक काळात मात्र कामाचा ताण वाढतो कारण तेव्हा अधिकारी आणि कर्मचारी Field Duty, Booth Management, Voter Awareness Programs, Logistic Planning यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडतात.
  • पण त्याचवेळी, या कामामुळे तुम्हाला सरकारी यंत्रणेचा प्रत्यक्ष अनुभव आणि देशसेवेचा आनंद मिळतो.

करिअर ग्रोथ आणि प्रमोशन (Career Growth & Promotion)

निवडणूक आयोगातील कर्मचारी पदोन्नतीद्वारे उच्च पदावर जाऊ शकतात.

उदा.

Junior Secretariat Assistant – Assistant -Section Officer -Under Secretary – Deputy Secretary -Director. तसेच, उत्कृष्ट कामगिरी दाखवणाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगात किंवा केंद्रीय मंत्रालयात डेप्यूटेशनची संधी मिळते.
ही नोकरी Stable Career + Pension Benefits + Respect in Service यासाठी प्रसिद्ध आहे.

Training आणि Skill Development

निवडणूक आयोगात नव्या कर्मचाऱ्यांना Orientation Training Program दिला जातो. यात निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम वापर, मतदार यादी व्यवस्थापन, आणि तक्रार निवारण याबद्दल प्रशिक्षण दिलं जातं. याशिवाय, Election Awareness Campaign, SVEEP कार्यक्रम, आणि IT System Training देखील घेतले जातात.

फील्ड ऑफिसर किंवा तात्पुरत्या कर्मचाऱ्यांसाठी संधी

प्रत्येक राज्यातील Chief Electoral Officer (CEO Office) दरवर्षी निवडणुकीच्या काळात फील्ड ऑफिसर, ब्लॉक लेव्हल ऑफिसर (BLO), डेटा एंट्री ऑपरेटर, Voter Awareness Assistant अशी पदं तात्पुरती भरतात.
या पदांसाठी अर्ज राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर (State Election Commission) उपलब्ध असतात. हे काम निवडणूक काळात 2-3 महिने चालते आणि अनुभवपत्रक (Experience Certificate) मिळतो, जो पुढील सरकारी नोकरीसाठी उपयुक्त ठरतो.

हे वाचा

भत्ते आणि अतिरिक्त सुविधा

ECI मधील कर्मचाऱ्यांना पगारासोबतच अनेक सुविधा मिळतात.

  • Dearness Allowance (DA)
  • House Rent Allowance (HRA)
  • Travel Allowance (TA)
  • Medical Reimbursement
  • Pension & Provident Fund
  • Festival Bonus आणि Increment

याशिवाय, Election Duty दरम्यान अतिरिक्त भत्ते (Honorarium) देखील दिले जातात.

भविष्यातील संधी (Future Scope)

2025 ते 2029 दरम्यान देशभरात अनेक निवडणुका नियोजित आहेत. राज्यसभा, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका. त्यामुळे निवडणूक आयोग आणि संबंधित कार्यालयांमध्ये Contractual + Permanent Posts मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही आजपासून तयारी सुरू केली, तर पुढील 1-2 वर्षांत Election Commission Jobs साठी उत्कृष्ट संधी मिळू शकते.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..