मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या (HSC) परीक्षेचा निकाल उद्या, २ मे २०२६ रोजी दुपारी ठीक १ वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. यावर्षी राजभरातून लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. निकालाची सर्व तांत्रिक तयारी पूर्ण झाली असून बोर्डाने अधिकृत संकेतस्थळांची यादी जाहीर केली आहे.
निकालासाठी अधिकृत संकेतस्थळ (Official Websites)
| संकेतस्थळाचे नाव | थेट लिंक (Direct Link) |
|---|---|
| DigiLocker (डिजिटल मार्कशीटसाठी) | येथे क्लिक करा |
| Official Board Result | येथे क्लिक करा |
| MKCL Result Portal | येथे क्लिक करा |
| Target Publications | येथे क्लिक करा |
| Navneet Result | येथे क्लिक करा |
निकाल असा पाहा (Step-by-Step Guide)
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून पाहता येईल,
- स्टेप १: वरीलपैकी कोणत्याही एका अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- स्टेप २: होम पेजवर ‘HSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप ३: तुमचा Roll Number (सीट नंबर) आणि आईचे नाव (Mother’s Name) अचूक टाईप करा.
- स्टेप ४: ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
- स्टेप ५: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट काढा किंवा पीडीएफ सेव्ह करा.
महत्त्वाची टीप: विद्यार्थ्यांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांवरूनच निकाल तपासावा. सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
मिळालेले गुण हे तुमच्या कष्टाचे फळ आहेत. यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि ज्यांना अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत, त्यांनी खचून न जाता नवीन संधी शोधल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, एक निकाल तुमचे संपूर्ण भविष्य ठरवू शकत नाही, ही तर फक्त एक सुरुवात आहे.




