मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात करिअरचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. IBPS RRB Bharti 2025 अंतर्गत तब्बल 13,217 पदांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे. देशभरातील लाखो उमेदवारांना Officer Scale I, II, III आणि Office Assistant (Multipurpose) या पदांवर काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ग्रामीण बँकांमध्ये प्रतिष्ठित नोकरी, चांगला पगार आणि चांगल भवितव्य मिळवण्यासाठी ही भरती म्हणजे एक सुवर्णसंधी आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.

हे वाचा

IBPS RRB Recruitment 2025 – 13,217 पदांसाठी मेगाभरती जाहीर

भरतीचे नावIBPS RRB Bharti 2025 (CRP RRBs XIV)
एकूण पदसंख्या13,217
मुख्य पदेऑफिस असिस्टंट – 7,972
ऑफिसर स्केल-I – 3,907
ऑफिसर स्केल-II – 1,139
ऑफिसर स्केल-III – 199
शैक्षणिक पात्रतादवी / स्पेशलायझेशननुसार शिक्षण + अनुभव
वयोमर्यादाऑफिस असिस्टंट : 18 ते 28 वर्षे
ऑफिसर स्केल-I : 18 ते 30 वर्षे
ऑफिसर स्केल-II : 21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-III : 21 ते 40 वर्षे
सूटSC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे
अर्ज फीGeneral/OBC – 850 रुपये
SC/ST/PWD/ExSM – 175 रुपये
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया Online
शेवटची तारीख21 सप्टेंबर 2025
परीक्षाPrelims – नोव्हेंबर/डिसेंबर 2025
Mains/Single – डिसेंबर 2025/फेब्रुवारी 2026

Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत ग्रामीण भागातील बँकांमध्ये काम करण्यासाठी RRB XIV Recruitment 2025 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीतून एकूण 13,217 पदांसाठी मेगाभरती होणार आहे. ही संधी Officer Scale I, II, III तसेच Office Assistant (Multipurpose) या पदांसाठी उपलब्ध आहे.

पदांची संख्या किती आहे?

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिस असिस्टंट (Multipurpose)7,972
2ऑफिसर स्केल-I (Assistant Manager)3,907
3ऑफिसर स्केल-II (General Banking Officer)854
4ऑफिसर स्केल-II (IT)87
5ऑफिसर स्केल-II (CA)69
6ऑफिसर स्केल-II (Law)48
7ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)16
8ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)15
9ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)50
10ऑफिसर स्केल-III199
Total—13,217

या भरतीत सर्वाधिक जागा Office Assistant (7,972 जागा) आणि Officer Scale-I (3,907 जागा) या पदांसाठी आहेत. याशिवाय Officer Scale-II व III पदांवरही अनेक जागा असून त्यासाठी विशेष शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • Office Assistant व Officer Scale-I साठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात.
  • Officer Scale-II मध्ये विविध स्पेशलायझेशन जसे IT, CA, Law, Treasury, Marketing आणि Agriculture Officer पदांसाठी संबंधित विषयातील पदवी/पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव अपेक्षित आहे.
  • Officer Scale-III साठी किमान 50% गुणांसह पदवी आणि 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
हे वाचा

वयोमर्यादा काय आहे?

पदवयोमर्यादा
ऑफिस असिस्टंट18 ते 28 वर्षे
ऑफिसर स्केल-I18 ते 30 वर्षे
ऑफिसर स्केल-II21 ते 32
ऑफिसर स्केल-III21 ते 40 वर्षे

पदांनुसार वयोमर्यादा वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. Office Assistant साठी 18 ते 28 वर्षे, Officer Scale-I साठी 18 ते 30 वर्षे, Officer Scale-II साठी 21 ते 32 वर्षे तर Officer Scale-III साठी 21 ते 40 वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनमान्य सवलत लागू आहे.

अर्ज फी किती आहे?

अर्ज करण्यासाठी General व OBC उमेदवारांसाठी 850 रुपये इतकी फी आहे. तर SC/ST/PWD/ExSM उमेदवारांसाठी फक्त 175 रुपये इतकी फी आकारण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतातील Regional Rural Banks (RRBs) मध्ये नियुक्ती मिळणार आहे.

महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे. प्राथमिक परीक्षा (Prelims) नोव्हेंबर / डिसेंबर 2025 मध्ये होईल, तर मुख्य परीक्षा (Mains) किंवा एकल परीक्षा डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात येईल.

अर्ज प्रक्रिया काय आहे?

  • उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने करावयाचा आहे.
  • अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, फोटो व सही यांचे स्कॅन अपलोड करणे आवश्यक आहे.
हे वाचा

IBPS RRB Recruitment 2025 Important Links

लिंकतपशील
Apply Onlineclick here
Notification PDFclick here
Official Websiteclick here

IBPS RRB Bharti 2025 ही फक्त नोकरीची संधी नाही तर बँकिंग क्षेत्रात उज्वल भविष्य घडवण्याचा मार्ग आहे. ज्यांच्याकडे स्वप्नं आहेत आणि ती पूर्ण करण्याची जिद्द आहे, त्यांच्यासाठी ही भरती एक मोठं व्यासपीठ आहे. योग्य तयारी, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही ही स्पर्धा नक्की जिंकू शकता. आजचा प्रयत्नच उद्याचा यशाचा पाया ठरेल मित्रांनो, त्यामुळे ही संधी सोडू नका, तुमचं यश तुमची वाट पाहत आहे.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकायेथे क्लिक करा

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.