तुम्ही सरकारी क्षेत्रात तुमचे करिअर घडवू इच्छिता का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! IOCL Bharti 2025 अंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने तब्बल ३९४ रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, Indian Oil Corporation Limited मध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट आणि क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट यांसारख्या प्रतिष्ठित पदांवर काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc पदवीधर असाल, तर ही संधी मुळीच सोडू नका.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production) | 232 |
| 2 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) | 37 |
| 3 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) | 22 |
| 4 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical) / ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV (Electrical) | 12 |
| 5 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical) / ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV (Mechanical) | 14 |
| 6 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation) / ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV (Instrumentation) | 06 |
| 7 | ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV | 20 |
| 8 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety) | 51 |
| एकूण जागा | 394 | |
शैक्षणिक पात्रता: पदांनुसार इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical, Mechanical, Electrical, Instrumentation), B.Sc. (Physics, Chemistry, Maths) किंवा १०वी/१२वी सह संबंधित कोर्सेस आवश्यक आहेत.
वयोमर्यादा: ३१ डिसेंबर २०२५ रोजी १८ ते २६ वर्षे असावे. (SC/ST ला ०५ वर्षे आणि OBC ला ०३ वर्षे सवलत). अनाथ: अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार सवलत लागू असेल (अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी).
परीक्षा फी: General/OBC/EWS साठी ३०० रुपये आणि SC/ST/PWD/ExSM प्रवर्गासाठी कोणतीही फी नाही.
पगार: पगार श्रेणी अंदाजे २५,००० ते १,०५,००० रुपये (अधिकृत जाहिरातीनुसार ग्रेड-IV नॉन-एक्झिक्युटिव्ह वेतनश्रेणी).
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (विविध रिफायनरीज जसे की गुवाहाटी, बरौनी, गुजरात, हल्दिया, मथुरा, पानिपत, डिग्बोई, बोँगाईगाव, पारादीप).
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (IOCL च्या अधिकृत पोर्टलवरून).
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०९ जानेवारी २०२६ (२३:५५ वाजेपर्यंत).
परीक्षा: जानेवारी २०२६ मध्ये अपेक्षित आहे.
| महत्वाच्या लिंक्स | लिंक |
|---|---|
| अधिकृत जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज करा | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |




