मित्रांनो, गरीब घरातील हुशार मुलांनाही डॉक्टर, इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांची स्वप्ने अर्धवट थांबतात, पण आता LIC घेऊन आलंय अशी योजना जी तुमच्या स्वप्नांना उड्डाण देईल. LIC गोल्डन जुबली स्कॉलरशिप 2025 (LIC Golden Jubilee Scholarship 2025) अंतर्गत विद्यार्थ्यांना 20,000 रुपये पासून ते 40,000 रुपये पर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे. ही शिष्यवृत्ती म्हणजे फक्त पैसे नाहीत, तर गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी LIC कडून दिलेली एक नवी आशा आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.
LIC Golden Jubilee Scholarship 2025 : 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची सुवर्णसंधी
| मुद्दा | माहिती |
|---|---|
| योजना नाव | LIC गोल्डन जुबली स्कॉलरशिप 2025 |
| संस्था | लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) |
| उद्दिष्ट | आर्थिकदृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणे |
| लागू कोर्स | मेडिकल, इंजिनिअरिंग, डिग्री, डिप्लोमा, ITI |
| शिष्यवृत्ती रक्कम | 15,000 ते 40,000 रुपये दरवर्षी (कोर्सनुसार) |
| विशेष शिष्यवृत्ती | मुलींसाठी दरवर्षी 15,000 रुपये |
| पात्रता | कुटुंबाची वार्षिक कमाई 4.50 लाखांपेक्षा कमी + 10वी/12वीत किमान 60% गुण |
| विद्यार्थ्यांची निवड | प्रत्येक 112 डिव्हिजनल ऑफिसमधून 100 विद्यार्थी (80 सामान्य + 20 फक्त मुलींसाठी) |
| अर्जाची शेवटची तारीख | 6 ऑक्टोबर 2025 |
| अर्ज प्रक्रिया | https://licindia.in वर ऑनलाइन अर्ज |
शिक्षण हेच खरे भांडवल आहे, पण अनेक विद्यार्थ्यांची स्वप्ने फक्त पैशाअभावी अर्धवट राहतात. अशा गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना उभारी देण्यासाठी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ने गोल्डन जुबली स्कॉलरशिप योजना 2025 सुरू केली आहे. ही योजना म्हणजे गरीब विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असून त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
शिष्यवृत्ती किती दिवस मिळणार?
या शिष्यवृत्तीचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मिळेल. मुलींसाठी खास “स्पेशल गर्ल स्कॉलरशिप” दोन वर्षांसाठी दिली जाईल. मात्र, जर विद्यार्थ्यांना कोर्स दरम्यान इंटर्नशिप किंवा स्टायपेंड मिळायला सुरुवात झाली, तर शिष्यवृत्ती बंद केली जाईल.
शिष्यवृत्तीमधून किती पैसे मिळतील?
मेडिकल फील्डसाठी शिष्यवृत्ती
जे विद्यार्थी 12वी नंतर मेडिकल क्षेत्रात (MBBS, BAMS, BHMS, BDS) प्रवेश घेतील, त्यांना LIC कडून दरवर्षी 40,000 रुपये ची शिष्यवृत्ती मिळणार आहे. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये (20,000 + 20,000) विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. म्हणजेच, डॉक्टर होण्याचं स्वप्न आता पैशाअभावी थांबणार नाही.
इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
जे विद्यार्थी BE, B.Tech किंवा B.Arch सारख्या इंजिनिअरिंग कोर्समध्ये प्रवेश घेतील, त्यांना दरवर्षी 30,000 रुपये ची मदत दिली जाईल. ही रक्कम दोन हप्त्यांत (15,000 + 15,000 रुपये) दिली जाईल. त्यामुळे इंजिनिअर होण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
डिग्री, डिप्लोमा आणि ITI साठी शिष्यवृत्ती
सामान्य डिग्री, डिप्लोमा किंवा ITI कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना LIC दरवर्षी 20,000 रुपये ची शिष्यवृत्ती देईल. ही रक्कम सुद्धा दोन हप्त्यांत (10,000 + 10,000 रुपये) जमा केली जाईल.
मुलींसाठी खास शिष्यवृत्ती
LIC ने मुलींसाठी वेगळी “स्पेशल स्कॉलरशिप” ठेवली आहे. यात 10वी नंतर ITI, 12वी किंवा डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींना दरवर्षी 15,000 मिळतील. ही रक्कमही दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल.
थोडक्यात सांगायचं झालं तर, मित्रांनो मेडिकल विद्यार्थ्यांना सर्वाधिक 40,000 रुपये, इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना 30,000 रुपये, डिग्री/डिप्लोमा/ITI विद्यार्थ्यांना 20,000 रुपये आणि मुलींना स्पेशल शिष्यवृत्तीतून 15,000 रुपये दरवर्षी मिळणार आहे.
शिष्यवृत्तीची पात्रता काय आहे?
- उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 4.50 लाखांपेक्षा कमी असावे.
- 10वी नंतर: किमान 60% गुण आणि पुढील अभ्यासक्रमात प्रवेश.
- 12वी नंतर: किमान 60% गुण आणि उच्च शिक्षणात प्रवेश.
- मुलींसाठी: 10वीमध्ये 60% गुण आणि पुढील ITI/12वी/डिप्लोमा/हायर स्टडीजसाठी प्रवेश आवश्यक.
टीप:- ही शिष्यवृत्ती Postgraduate अभ्यासक्रमांसाठी लागू नाही.
किती विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती?
LIC च्या 112 डिव्हिजनल ऑफिसेसमधून प्रत्येकी 100 विद्यार्थी निवडले जाणार असून, एकूण हजारो विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक ऑफिसमधील 100 विद्यार्थ्यांपैकी 80 विद्यार्थ्यांना सामान्य शिष्यवृत्ती दिली जाईल, ज्यात 40 मुलगे आणि 40 मुलींचा समावेश असेल. जर मुलग्यांची संख्या कमी झाली, तर ती जागा मुलींना दिली जाईल. उर्वरित 20 शिष्यवृत्ती फक्त मुलींसाठी राखीव असतील. म्हणजेच, या योजनेत मुलींना विशेष प्राधान्य देण्यात आलं असून LIC ने गरजू मुलींना मोठा आधार दिला आहे.
अर्ज कसा करायचा?
- LIC गोल्डन जुबली शिष्यवृत्ती 2025 साठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम LIC ची अधिकृत वेबसाइट https://licindia.in ला भेट द्यावी.
- होमपेजवर उपलब्ध असलेल्या “CLICK HERE TO APPLY FOR LIC GOLDEN JUBILEE SCHOLARSHIPS 2025” या लिंकवर क्लिक करून अर्ज फॉर्म उघडावा.
- त्यात विचारलेली सर्व आवश्यक माहिती अचूक भरून सबमिट करावी.
- अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या नोंदणी केलेल्या ई-मेल आयडीवर एक पावती मेल (Acknowledgement Email) येईल. हाच मेल म्हणजे अर्ज यशस्वी झाल्याचा पुरावा असेल.
अर्जाची शेवटची तारीख
इच्छुक आणि पात्र विद्यार्थी 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
शिष्यवृत्तीचे पैसे कसे मिळतील?
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम NEFT द्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाईल. विद्यार्थ्यांनी अर्ज करताना बँक खाते क्रमांक, IFSC कोड आणि Cancelled Cheque सादर करणे आवश्यक आहे.
LIC Golden Jubilee Scholarship 2025
| महत्वाच्या लिंक | क्लिक करा |
|---|---|
| अधिकृत वेबसाइट (Official Website) | https://licindia.in |
| स्कॉलरशिप नोटिफिकेशन PDF | Click Here |
| Apply Online (ऑनलाइन अर्ज करा) | Click Here |
मित्रांनो, स्वप्नं पाहणं सोपं असतं, पण ती पूर्ण करण्यासाठी धडपडणं गरजेचं असतं. LIC गोल्डन जुबली शिष्यवृत्ती 2025 हीच संधी आहे जी गरीब घरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवण्यासाठी मदत करेल. डॉक्टर, इंजिनिअर किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवायचं असेल, तर आता पैशांची अडचण तुमच्या मार्गात अडथळा ठरणार नाही. त्यामुळे ही सुवर्णसंधी हातातून जाऊ देऊ नका. आजच अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी पहिले पाऊल टाका.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
| सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | येथे क्लिक करा |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..







