मित्रांनो तुम्हीही रेल्वे पोलीस दलात सामील होऊन महाराष्ट्र राज्याची सेवा करू इच्छिता? तर मग ही वेळ सज्ज होण्याची आहे. लोहमार्ग पोलिस भरती २०२६ अंतर्गत लवकरच मोठी पदभरती प्रक्रियेला सुरुवात होत असून, हजारो उमेदवार या संधीची वाट पाहत आहेत. कोणत्याही युद्धात उतरण्यापूर्वी जशी शास्त्रांची माहिती लागते, तशीच ही परीक्षा जिंकण्यासाठी तुम्हाला Maharashtra Railway Police Syllabus बारकाईने समजून घ्यावा लागेल. गणिताच्या ट्रिक्सपासून ते मराठी व्याकरणाच्या नियमांपर्यंत आणि रेल्वे विशेष सामान्य ज्ञानापर्यंत सर्व माहिती आम्ही या एकाच लेखात तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुमचे खाकीचे स्वप्न वास्तवात येईल.
| लोहमार्ग पोलिस भरती २०२६ | |
|---|---|
| परीक्षेचे नाव | महाराष्ट्र लोहमार्ग (रेल्वे) पोलीस भरती २०२६ |
| निवड प्रक्रिया | शारीरिक चाचणी (मैदानी) आणि लेखी परीक्षा |
| लेखी परीक्षा गुण | १०० गुण (१०० प्रश्न) |
| मैदानी चाचणी गुण | ५० गुण |
| वेळ मर्यादा | ९० मिनिटे (१.५ तास) |
| नकारात्मक गुण (Negative) | नाही |
| पात्रता | १२ वी उत्तीर्ण (HSC) |
| अधिकृत वेबसाईट | mahapolice.gov.in |
निवड प्रक्रिया (Selection Process)
महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस भरतीची निवड प्रक्रिया मुख्यत्वे दोन प्रमुख टप्प्यांत विभागलेली असते,
- शारीरिक चाचणी (Physical Test/PET): ५० गुण
- लेखी परीक्षा (Written Exam): १०० गुण
- वैद्यकीय तपासणी आणि चारित्र्य पडताळणी (Medical & Document Verification)
महत्त्वाची टीप: नियमांनुसार, प्रथम शारीरिक चाचणी घेतली जाते. त्यामध्ये पात्र ठरलेल्या (किमान ५०% गुण मिळवणाऱ्या) उमेदवारांना एका पदासाठी १० या प्रमाणात (१:१०) लेखी परीक्षेसाठी बोलावले जाते.
शारीरिक चाचणी स्वरूप (Physical Test Pattern)
लोहमार्ग पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीचे ५० गुणांचे विभाजन खालीलप्रमाणे असते,
| अ.क्र. | चाचणी प्रकार (Event) | निकष / अंतर | एकूण गुण |
|---|---|---|---|
| १. पुरुष उमेदवार (Male Candidates) | |||
| अ | धावणे (Running) | १६०० मीटर | ३० गुण |
| ब | धावणे (Sprints) | १०० मीटर | १० गुण |
| क | गोळा फेक (Shot Put) | ७.२६० किलो | १० गुण |
| पुरुष एकूण गुण: | ५० गुण | ||
| २. महिला उमेदवार (Female Candidates) | |||
| अ | धावणे (Running) | ८०० मीटर | ३० गुण |
| ब | धावणे (Sprints) | १०० मीटर | १० गुण |
| क | गोळा फेक (Shot Put) | ४ किलो | १० गुण |
| महिला एकूण गुण: | ५० गुण | ||
लेखी परीक्षेचे स्वरूप (Written Exam Pattern)
शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना १०० गुणांची वस्तुनिष्ठ (MCQ) बहुपर्यायी लेखी परीक्षा द्यावी लागते.
- एकूण प्रश्न: १००
- एकूण गुण: १००
- वेळ: ९० मिनिटे (१.५ तास)
- माध्यम: मराठी
- नकारात्मक गुण (Negative Marking): नाही
| अ.क्र. | विषय (Subject) | प्रश्नांची संख्या | एकूण गुण |
|---|---|---|---|
| १ | अंकगणित (Mathematics) | २५ | २५ |
| २ | बुद्धिमत्ता चाचणी (Intelligence Test) | २५ | २५ |
| ३ | मराठी व्याकरण (Marathi Grammar) | २५ | २५ |
| ४ | सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (GK & CA) | २५ | २५ |
| एकूण (Total) | १०० | १०० गुण | |
महत्त्वाची माहिती:
- परीक्षेचा कालावधी: ९० मिनिटे (१.५ तास)
- प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी वस्तुनिष्ठ (MCQ)
- नकारात्मक गुण (Negative Marking): नाही
सविस्तर अभ्यासक्रम (Detailed Syllabus) २०२६
| विषय (Subject) | महत्त्वाचे घटक (Important Topics) |
|---|---|
| मराठी व्याकरण (Marathi Grammar) | मराठी वर्णमाला, स्वर आणि व्यंजन शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद) विभक्ती, प्रयोग आणि समास समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, शब्दसिद्धी वाक्यप्रचार, म्हणी आणि त्यांचे अर्थ काळ व काळाचे प्रकार, शुद्धलेखन नियम |
| अंकगणित (Mathematics) | संख्या व संख्यांचे प्रकार, लसावी आणि मसावी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, सरासरी नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज काळ-काम-वेग, रेल्वे संबंधित उदाहरणे गुणोत्तर व प्रमाण, वारी (Age Problems) शेकडेवारी, भागीदारी व पदावली |
| बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) | संख्या मालिका, अक्षर मालिका, वेन आकृती दिशा ज्ञान चाचणी, नातेसंबंध रांगेतील स्थान, घड्याळ व कॅलेंडर सांकेतिक भाषा (Coding-Decoding) तार्किक अनुमान, आकृत्यांची गणना करणे |
| सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (GK & Current Affairs) | इतिहास: भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास, समाजसुधारक भूगोल: महाराष्ट्र व भारताचा भूगोल, नद्या, जिल्हे राज्यघटना: संविधानाची कलमे, पंचायत राज, राष्ट्रपती रेल्वे विशेष: रेल्वे झोन, महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग, पोलीस प्रशासन चालू घडामोडी: पुरस्कार, क्रीडा, नवीन सरकारी योजना, नियुक्ती |
मैदानी चाचणी: गुणविभाजन (Physical Marks Distribution)
शारीरिक चाचणीत पैकीच्या पैकी गुण मिळवणे हे लेखी परीक्षेचा भार कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
| प्रकार (Event) | वेळ / अंतर (Criteria) | मिळणारे गुण |
|---|---|---|
| १. पुरुष: १६०० मीटर धावणे (कमाल ३० गुण) | ||
| अतिउत्कृष्ट | ५ मि. १० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | ३० |
| उत्तम | ५ मि. १० से. ते ५ मि. ३० सेकंद | २७ |
| मध्यम | ५ मि. ३० से. ते ५ मि. ५० सेकंद | २४ |
| अपात्र | ७ मि. ३० सेकंदापेक्षा जास्त वेळ | ० |
| २. महिला: ८०० मीटर धावणे (कमाल ३० गुण) | ||
| अतिउत्कृष्ट | २ मि. ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | ३० |
| उत्तम | २ मि. ५० से. ते ३ मि. ०० सेकंद | २७ |
| मध्यम | ३ मि. ०० से. ते ३ मि. १० सेकंद | २४ |
| अपात्र | ६ मिनिटांपेक्षा जास्त वेळ | ० |
| ३. गोळा फेक (पुरुष ७.२६० किलो / महिला ४ किलो) | ||
| पुरुष (कमाल) | ८.५० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | १० |
| महिला (कमाल) | ६.०० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | १० |
| अपात्र (पुरुष) | ३.१० मीटरपेक्षा कमी | ० |
| अपात्र (महिला) | ४.०० मीटरपेक्षा कमी | ० |
रेल्वे पोलीस भरती विशेष घटक (Railway Specific GK)
- लोहमार्ग पोलीस परीक्षेत सामान्य ज्ञानाच्या भागात रेल्वेवर आधारित ३-५ प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. यामध्ये खालील मुद्द्यांचा अभ्यास करा:
- भारतीय रेल्वेचे झोन: भारतात एकूण किती रेल्वे झोन आहेत? महाराष्ट्रात कोणते मुख्य मुख्यालय आहेत? (उदा. मध्य रेल्वे – मुंबई CSMT, पश्चिम रेल्वे – चर्चगेट).
- ऐतिहासिक माहिती: भारतातील पहिली रेल्वे कधी धावली? (१६ एप्रिल १८५३, मुंबई ते ठाणे).
- रेल्वे सुरक्षा: RPF (Railway Protection Force) आणि GRP (Government Railway Police) मधील फरक काय?
- तांत्रिक माहिती: ब्रॉडगेज, मीटरगेज आणि नॅरोगेजमधील अंतर किती असते?
- current Affairs: नवीन सुरू झालेल्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस, रेल्वेचे नवीन ॲप्स (उदा. ‘मदत’ ॲप) आणि रेल्वे मंत्र्यांचे नाव.
विषयनिहाय ‘स्मार्ट’ तयारी कशी करावी?
मराठी व्याकरण:
फक्त व्याख्या पाठ करू नका. ‘मो. रा. वाळिंबे’ किंवा ‘बाळासाहेब शिंदे’ यांच्या पुस्तकातील शब्दसंग्रह (समानार्थी, विरुद्धार्थी, प्रयोग) रोज अर्धा तास वाचा. लोहमार्ग पोलीस भरतीत ‘शब्दसिद्धी’ आणि ‘अलंकार’ यावर थोडे कठीण प्रश्न विचारले जाऊ शकतात.
अंकगणित व बुद्धिमत्ता:
- पाढे: १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते ३० पर्यंतचे वर्ग आणि १ ते १५ पर्यंतचे घन तोंडपाठ असावेत. यामुळे वेळ वाचतो.
- शॉर्टकट ट्रिक्स: काळ-काम-वेग आणि नफा-तोटा या प्रकरणांमधील सूत्रे वापरण्यापेक्षा लॉजिकल ट्रिक्सचा सराव करा.
सामान्य ज्ञान (GK):
- महाराष्ट्र भूगोल: महाराष्ट्रातील लोहमार्गांचे जाळे, महत्त्वाचे बोगदे (उदा. कोकण रेल्वेवरील करबुडे बोगदा) यावर लक्ष द्या.
- चालू घडामोडी: मागील ६ महिन्यांतील क्रीडा पुरस्कार, नियुक्ती आणि सरकारी योजनांची माहिती ठेवा.
आवश्यक कागदपत्रे (Documents Checklist)
भरती प्रक्रियेवेळी खालील कागदपत्रे तयार ठेवणे अनिवार्य आहे:
१. १० वी व १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका.
२. डोमिसाईल प्रमाणपत्र (Maharashtra State Domicile Certificate).
३. जातीचा दाखला व नॉन-क्रीमी लेयर (आवश्यक असल्यास).
४. आधार कार्ड / पॅन कार्ड.
५. शाळा सोडल्याचा दाखला (LC).
६. खेळाडू/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/होमगार्ड असल्यास त्याचे अधिकृत प्रमाणपत्र.
लोहमार्ग पोलीस विरुद्ध जिल्हा पोलीस: मुख्य फरक
| वैशिष्ट्य | लोहमार्ग पोलीस (GRP) | जिल्हा/शहर पोलीस |
|---|---|---|
| कार्यक्षेत्र | रेल्वे स्थानके, धावत्या रेल्वे गाड्या आणि रेल्वेची हद्द. | संपूर्ण जिल्हा किंवा शहराचे भौगोलिक क्षेत्र. |
| जबाबदारी | रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे परिसरातील गुन्हे रोखणे. | जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारी नियंत्रण. |
| नियंत्रण | लोहमार्ग पोलीस आयुक्तालय / राज्य लोहमार्ग पोलीस. | जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) / शहर पोलीस आयुक्त (CP). |
| गणवेश | राज्य पोलीस दलाचा खाकी गणवेश (खांद्यावर GRP बिल्ला). | राज्य पोलीस दलाचा खाकी गणवेश (जिल्ह्याचे नाव). |
| गुन्हे तपास | केवळ रेल्वेच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करतात. | जिल्ह्यातील सर्व स्थानिक गुन्ह्यांचा तपास करतात. |
महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस भरती २०२६ – परीक्षा स्वरूप
| अ.क्र. | विषय (Subject) | प्रश्नांची संख्या | एकूण गुण |
|---|---|---|---|
| १ | अंकगणित (Mathematics) | २५ | २५ |
| २ | बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) | २५ | २५ |
| ३ | मराठी व्याकरण (Marathi Grammar) | २५ | २५ |
| ४ | सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (GK & CA) | २५ | २५ |
| एकूण | १०० | १०० | |
शारीरिक चाचणी (मैदानी परीक्षा) – ५० गुण
| इव्हेंट (Event) | पुरुष उमेदवार | महिला उमेदवार | गुण |
|---|---|---|---|
| लांब अंतर धावणे | १६०० मीटर | ८०० मीटर | ३० |
| कमी अंतर धावणे | १०० मीटर | १०० मीटर | १० |
| गोळा फेक | ७.२६० किलो | ४ किलो | १० |
पोलीस भरती २०२६: सर्वोत्तम पुस्तके (Online खरेदी करा)
| विषय | पुस्तकाचे नाव | लेखक | ऑनलाईन खरेदी |
|---|---|---|---|
| मराठी | परिपूर्ण मराठी व्याकरण | बाळासाहेब शिंदे | किंमत पहा |
| गणित | मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स | नितीन महाले | किंमत पहा |
| बुद्धिमत्ता | बुद्धिमत्ता चाचणी | अनिल अंकलगी | किंमत पहा |
| GK | तात्यांचा ठोकळा | एकनाथ पाटील | किंमत पहा |
| प्रश्नपत्रिका | ३५०००+ जम्बो सराव संच | सिद्धेश्वर हडबे | किंमत पहा |
टीप: वरील लिंक्स अफिलिएट लिंक्स आहेत. जर तुम्ही या लिंकवरून पुस्तक खरेदी केले, तर आम्हाला त्यातून काही कमिशन मिळू शकते, ज्यामुळे आम्हाला अशीच उपयुक्त माहिती मोफत देण्यास मदत होईल.
मित्रांनो, लोहमार्ग पोलिस भरती २०२६ ही केवळ एक नोकरीची संधी नाही, तर रेल्वेच्या प्रवाशांना सुरक्षितता देण्याची आणि अभिमानाने खाकी वर्दी परिधान करण्याची एक सुवर्णसंधी आहे. स्पर्धा मोठी आहे, हे मान्य; पण तुमची जिद्द आणि योग्य दिशेने केलेला अभ्यास यासमोर कोणतीही स्पर्धा मोठी नसते. वर दिलेल्या Maharashtra Railway Police Syllabus नुसार आजच तुमच्या अभ्यासाचे नियोजन करा, मैदानावर घाम गाळा आणि स्वतःला सिद्ध करा. लक्षात ठेवा, जो शांततेच्या काळात जास्त घाम गाळतो, त्याला युद्धाच्या वेळी (परीक्षेच्या वेळी) कमी रक्त सांडावे लागते. तुमच्या या प्रवासात आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि हा लेख तुमच्या इतर पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तुमच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.




