पुणे जिल्हा बँकेच्या भरती परीक्षेत सहभागी झालेल्या हजारो उमेदवारांसाठी मोठी अपडेट. बँकेने अधिकृत संकेतस्थळावर उत्तरपत्रिका (PDCC Bank Answer Key 2025) जाहीर केली आहे. आता उमेदवार आपल्या लॉगिनद्वारे प्रश्नपत्रिकेतील उत्तरे तपासू शकतात आणि आपल्या गुणांचा अंदाज घेऊ शकतात. यामुळे निकालापूर्वीच उमेदवारांना आपल्या कामगिरीची झलक पाहता येणार आहे.

हे वाचा

पुणे जिल्हा बँक भरती 2025 उत्तरपत्रिका जाहीर | PDCC Bank Answer Key Download

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC Bank) भरती परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेने अधिकृत संकेतस्थळावर उत्तरतालिका (Answer Key 2025) प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांना आता आपल्या लॉगिन आयडी व पासवर्डच्या मदतीने उत्तरपत्रिका पाहता येणार आहे.

उत्तरपत्रिका कशी पाहावी?

  • उमेदवारांनी प्रथम बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • त्यानंतर आपल्या प्रोफाईलमध्ये लॉगिन करून “View Details” या पर्यायावर क्लिक करावे.
  • यानंतर उमेदवाराला आपल्या प्रश्नपत्रिकेची उत्तरतालिका सहजपणे डाउनलोड करता येईल.

हरकत नोंदविण्याची सुविधा

एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत उमेदवारांना शंका असल्यास किंवा उत्तर चुकीचे असल्याचे वाटल्यास बँकेने “Answer Key Query” हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायाद्वारे उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने हरकत नोंदविता येईल. मात्र हरकत नोंदवताना योग्य पुरावा अथवा डॉक्युमेंट जोडणे अनिवार्य आहे.

हरकत नोंदविण्याची अंतिम मुदत

उत्तरतालिकेबाबत हरकत नोंदविण्यासाठी बँकेने अंतिम तारीख निश्चित केली आहे. उमेदवारांना 30 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 5.00 वाजेपर्यंत हरकत नोंदविण्याची परवानगी आहे. त्यानंतर केलेल्या कोणत्याही तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत. तसेच ई-मेल, टपाल किंवा इतर माध्यमातून केलेल्या तक्रारी बँक मान्य करणार नाही.

अंतिम उत्तरपत्रिका

उमेदवारांकडून आलेल्या हरकतींचे परीक्षण करून PDCC Bank अंतिम उत्तरपत्रिका जाहीर करणार आहे. एकदा अंतिम Answer Key प्रसिद्ध झाल्यावर त्याच्यावर आधारित निकाल (Result) घोषित केला जाईल. त्यामुळे उमेदवारांनी हरकत नोंदविताना योग्य पुरावे जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे वाचा

PDCC Bank Answer Key Download

LinksClick Here
PDCC Bank Official Websiteयेथे क्लिक करा
Download Answer Key 2025येथे क्लिक करा

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..