मित्रांनो रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ग्रुप D लेव्हल 1 परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षेचे शहर (Exam City) कळवण्यासाठी सिटी इंटीमेशन स्लिप जारी करते. या स्लिपद्वारे उमेदवाराला त्याची परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे याची माहिती वेळेआधी मिळते. ही स्लिप फक्त माहिती देण्यासाठी असते आणि याचा वापर प्रवेशपत्र (Admit Card) म्हणून करता येत नाही.

हे वाचा

सिटी स्लिप कधी जारी होऊ शकते?

RRB कडून अधिकृतरीत्या असे सांगण्यात आले आहे की परीक्षा शहराची स्लिप (Exam City Slip) कधीही वेबसाइटवर सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे rrbcdg.gov.in किंवा संबंधित RRB ची अधिकृत साइट तपासत राहणे आवश्यक आहे.

परीक्षा कधी होणार?

RRB ग्रुप D CBT परीक्षा संपूर्ण देशभरात 17 नोव्हेंबर 2025 पासून सुरु होईल आणि ही परीक्षा डिसेंबर 2025 च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक आणि शिफ्टची नेमकी माहिती नंतर अधिकृत सूचना द्वारे दिली जाईल.

ॲडमिट कार्ड कधी मिळेल?

ॲडमिट कार्ड परीक्षा तारखेच्या 4 दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. यानुसार, जर परीक्षा 17 नोव्हेंबरपासून सुरु होत असेल तर प्रवेशपत्र 14 नोव्हेंबरला उपलब्ध होईल. लक्षात ठेवा मित्रांनो परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रिंटेड एडमिट कार्ड आणि वैध ओळखपत्र (ID Proof) सोबत असणे अनिवार्य आहे.

हे वाचा

सिटी स्लिप कशी डाउनलोड करायची?

  • सिटी स्लिप डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराने rrbcdg.gov.in (किंवा आपला RRB झोनल वेबसाइट) उघडावी.
  • त्यानंतर होमपेजवर “City Intimation Slip – RRB Group D 2025” असा लिंक दिसेल.
  • त्या लिंकवर क्लिक करून आपला रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करायचे.
  • स्क्रीनवर तुमची सिटी स्लिप दिसेल, जी तुम्ही सेव्ह किंवा प्रिंट करू शकता.

RRB Group D परीक्षा पॅटर्न (CBT)

विषयप्रश्नांची संख्याकमाल गुणकालावधी
गणित (Mathematics)303090 मिनिटे
सामान्य बुद्धिमत्ता व तर्क (Reasoning)3030
सामान्य विज्ञान (General Science)2525
सामान्य जागरूकता व चालू घडामोडी (GA/Current Affairs)1515
एकूण10010090 मिनिटे

ग्रुप D परीक्षा संगणक आधारित (CBT) पद्धतीने होणार आहे. पेपरमध्ये एकूण 100 मल्टिपल चॉईस प्रश्न विचारले जातील. गणितातून 30 प्रश्न, सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्तीमधून 30 प्रश्न, सामान्य विज्ञानातून 25 प्रश्न आणि चालू घडामोडी व सामान्य ज्ञानातून 15 प्रश्न विचारले जातील. सर्व पेपर पूर्ण करण्यासाठी 90 मिनिटे (1 तास 30 मिनिटे) वेळ दिला जाईल.

हे वाचा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..