बँकिंगमध्ये करिअर करायचं स्वप्न बाळगणाऱ्या लाखो तरुणांसाठी सुवर्णसंधी. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने क्लर्क (ज्युनिअर असोसिएट्स) भरती परीक्षेच्या 2025 च्या तारखा अखेर जाहीर केल्या आहेत. देशभरातील उमेदवारांची आतुरतेने वाट पाहिली जाणारी ही परीक्षा 20, 21 आणि 27 सप्टेंबर 2025 रोजी होणार असून या भरतीद्वारे तब्बल 6,589 जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि आकर्षक नोकरी शोधत असाल, तर हीच तुमच्यासाठी योग्य संधी ठरू शकते.

हे वाचा

SBI Clerk Exam Dates 2025 : एसबीआय क्लर्क प्रिलिम्स परीक्षा तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

एकूण रिक्त जागा

या भरतीद्वारे 6,589 जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी 5,180 नियमित (Regular) जागा असून 1,409 बॅकलॉग (Backlog) जागा आहेत. या भरतीमुळे हजारो उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.

जागांचे वाटप

एसबीआयने कॅटेगरीनुसार जागांचे आरक्षण जाहीर केले आहे. यात जनरल (2255), SC (788), ST (450), OBC (1179) आणि EWS (508) जागा समाविष्ट आहेत. या जागा संपूर्ण भारतभरातील विविध शाखांमध्ये वाटप केल्या जाणार आहेत.

परीक्षा प्रक्रिया

या भरतीची निवड प्रक्रिया दोन मुख्य टप्प्यात होणार आहे.

  • प्रीलिम्स परीक्षा : ही 100 गुणांची ऑनलाइन परीक्षा असेल. प्रश्न सोपे ते मध्यम स्वरूपाचे असतील.
  • मेन परीक्षा : एकूण 190 प्रश्न विचारले जातील.
  • परीक्षा कालावधी : 2 तास 40 मिनिटे.

याशिवाय, ज्या उमेदवारांनी 10वी किंवा 12वी मध्ये स्थानिक भाषा शिकलेली नाही, त्यांना भाषा प्रावीण्य चाचणी (Language Proficiency Test) द्यावी लागेल.

हे वाचा

मेरिट लिस्ट आणि अंतिम निवड

महत्वाचे म्हणजे, फायनल मेरिट लिस्ट फक्त मेन परीक्षेच्या गुणांवर आधारित असेल. प्रिलिम्स परीक्षा ही फक्त पात्रता चाचणी (qualifying) असेल. अंतिम निवड उमेदवारांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि स्थानिक भाषेच्या परीक्षेत यशस्वी झाल्यावरच होईल.

पगार (Salary)

एसबीआय क्लर्क म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा अंदाजे 24,050 ते 64,480 रुपये इतका पगार मिळेल. यासोबतच बँकेचे विविध भत्ते आणि सुविधा देखील दिल्या जातील.

ॲडमिट कार्ड

परीक्षेचे कॉल लेटर / एडमिट कार्ड लवकरच SBI च्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in उपलब्ध होणार आहे. उमेदवार आपले रजिस्ट्रेशन डिटेल्स टाकून एडमिट कार्ड सहज डाउनलोड करू शकतील.

हे वाचा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकायेथे क्लिक करा

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.