SSC CHSL परीक्षा ही लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अतिशय महत्त्वाची आहे. पण 2025 च्या या परीक्षेचा शेड्यूल थोडा गोंधळात पडला आहे. सुरुवातीला परीक्षा 8 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2025 या कालावधीत होणार असल्याचे मानले जात होते. मात्र, CGL Tier-1 परीक्षा (12 सप्टेंबर – 26 सप्टेंबर 2025) याच काळात आल्याने दोन्ही परीक्षांच्या तारखा आपसात धडकल्या. त्यामुळे SSC CHSL 2025 सध्या थोडा मागे ढकलला गेला आहे.

हे वाचा

परीक्षा कधी होऊ शकते?

सध्या CGL परीक्षा सुरू असल्याने CHSL परीक्षा तिच्यानंतरच होण्याची शक्यता जास्त आहे. अनेक तज्ञांचे म्हणणे आहे की, SSC CHSL Tier-1 परीक्षा ऑक्टोबर 2025 मध्ये आयोजित होऊ शकते. मात्र ही फक्त संभाव्यता आहे, अधिकृत माहिती फक्त SSC कडूनच येईल. म्हणून उमेदवारांनी दररोज अधिकृत वेबसाइट तपासत राहणे गरजेचे आहे.

ॲडमिट कार्ड कधी येईल?

SSC ने CGL परीक्षेचे Admit Card आणि Exam City Slip हे परीक्षा सुरू होण्याच्या 9–10 दिवस आधी प्रसिद्ध केले होते. त्यामुळे CHSL साठीही हाच पॅटर्न राहील, अशी अपेक्षा आहे. म्हणजेच उमेदवारांना आधी Exam City Slip मिळेल आणि त्यानंतर काही दिवसांनी Admit Card डाउनलोड करता येईल.

ॲडमिट कार्ड कसे डाउनलोड करावे?

SSC CHSL 2025 चे Admit Card मिळवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा,

  1. ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. “Admit Card” सेक्शनमध्ये क्लिक करा.
  3. तिथे “SSC CHSL Admit Card 2025 Download” हा लिंक दिसेल.
  4. आपला Registration Number / Roll Number आणि Password / Date of Birth टाका.
  5. Submit केल्यावर Admit Card स्क्रीनवर दिसेल.
  6. ते PDF स्वरूपात डाउनलोड करून प्रिंट घ्या.
हे वाचा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकायेथे क्लिक करा

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..