करंट अफेअर्स म्हणजेच आजच्या घडामोडींचा आरसा.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तर ही माहिती सोन्याहून पिवळी असते, कारण यातूनच प्रश्न विचारले जातात. देश-विदेशात दररोज घडणाऱ्या घटना फक्त बातम्या नसून त्या आपल्या भविष्याचा मार्गही ठरवतात. म्हणूनच तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत 18 सप्टेंबर 2025 चे ताजेतवाने आणि महत्त्वाचे करंट अफेअर्स, जे तुमच्या अभ्यासाला नक्कीच मदत करती.
Todays Current Affairs in Marathi | 18 September 2025
- RBI ने ग्राहकांचे संरक्षण वाढवण्यासाठी पेमेंट अॅग्रीगेटर्ससाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
- ISRO कडून ऑन-ऑर्बिट सर्व्हिसिंग आणि इंधन भरण्याच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांना आमंत्रण दिले जाणार.
- केंद्र सरकारने तामिळनाडू आणि आसाममधील ग्रामीण संस्थांसाठी 15 व्या वित्त आयोगामार्फत 342 कोटींचा निधी जारी केला.
- स्वच्छता ही सेवा 2025 या राष्ट्रीय मोहिमेच्या 9व्या आवृत्तीला सुरुवात झाली.
- पीएम विश्वकर्मा आणि राष्ट्रीय SC-ST हब मेगा कॉन्क्लेव्ह बोधगया येथे सुरू झाले.
- भारताने रशियाच्या नेतृत्वाखालील जापद-2025 सैनिकी सरावामध्ये 65 जवानांसह सहभाग नोंदवला.महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे IMD ने संपूर्ण राज्यासाठी यलो अलर्ट जारी केला.
- नेपाळने जनरेशन-झेड आंदोलनातील पीडितांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय शोक व सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.
- बांग्लादेशातील इस्लामी पक्षांनी नवीन आंदोलन कार्यक्रम जाहीर केला आणि निवडणूक सुधारणांची मागणी केली.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी TikTok ला देशात चालू ठेवण्यासाठी कराराची घोषणा केली.
- अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी गाझा संकटाच्या पार्श्वभूमीवर कतारच्या अमीर यांची भेट घेतली.
- इस्राईलने भीषण बॉम्बहल्ल्यानंतर गाझा शहरावर जमीनी हल्ला चढवला.
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल….




