मित्रांनो, डॉक्टर होणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं, पण MBBS किंवा BDS मध्ये प्रवेश मिळवणं म्हणजे जणू एव्हरेस्ट सर करण्यासारखं अवघड. प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी NEET साठी बसतात, पण जागा मर्यादित असल्यामुळे हजारो स्वप्नं अपूर्ण राहतात. पण काळजी करू नका मित्रांनो , वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी फक्त MBBS किंवा BDS हाच एकमेव मार्ग नाही. आज अनेक असे पर्यायी कोर्सेस उपलब्ध आहेत जे फक्त उच्च उत्पन्नच देत नाहीत तर समाजसेवेची संधीही देतात. चला तर मग जाणून घेऊ या MBBS/BDS शिवायच्या टॉप 10 वैकल्पिक मेडिकल कोर्सेस, जे तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकतात.

हे वाचा

Top 10 Alternative Medical Courses : MBBS/BDS शिवाय High Income Career Opportunities

Course NameCareer Scope / Job Opportunities
BAMS (Ayurveda)Ayurvedic hospitals, wellness centers, private clinic
BHMS (Homeopathy)Homeopathy clinic, research, pharma companies
BUMS (Unani)Unani hospitals, wellness therapy centers
Siddha MedicineSouth India institutes, wellness & herbal centers
BNYS (Naturopathy & Yogic Science)Yoga centers, naturopathy clinics, resorts
BPT (Physiotherapy)Hospitals, sports academy, rehab centers
B.Pharm (Pharmacy)Pharma companies, drug research, medical store
Nursing & ParamedicalHospitals, labs, emergency services, abroad jobs
Occupational & Speech TherapyRehab centers, schools, clinics
Forensic Science & Medical BiotechnologyForensic labs, biotech companies, research

बर्‍याच विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की MBBS किंवा BDS करून डॉक्टर व्हावं. पण ह्या क्षेत्रात प्रवेश मिळवणं खूप अवघड आहे – NEET मधली तीव्र स्पर्धा, कमी जागा आणि जास्त कट-ऑफ्स यामुळे अनेक जण अपूर्णतेने परत जातात. पण याचा अर्थ असा नाही की वैद्यकीय क्षेत्रात करिअर करता येणार नाही. MBBS / BDS शिवाय सुद्धा अनेक उत्तम कोर्सेस उपलब्ध आहेत जे आरोग्यसेवा क्षेत्रात चांगले उत्पन्न, सन्मान आणि करिअर वाढ देतात.

आयुष (AYUSH) कोर्सेस

भारताची परंपरा आणि आयुर्वेद, होम्योपॅथी, यूनानी, सिद्धा व नैसर्गिक चिकित्सा या पद्धती आज पुन्हा लोकप्रिय होत आहेत. BAMS, BHMS, BUMS, Siddha व Naturopathy हे कोर्सेस आजच्या काळात फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही मागणीला आहेत. या शाखेत विद्यार्थी स्वतःची क्लिनिक सुरू करू शकतात, वेलनेस सेंटरमध्ये काम करू शकतात किंवा रिसर्चमध्ये करिअर करू शकतात.

फिजिओथेरपी (BPT)

फिजिओथेरपी म्हणजेच पुनर्वसनाचा आधार. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना चालणे-बोलणे, अंगविकास परत मिळवणे किंवा खेळाडूंना फिट ठेवणे या सगळ्यात फिजिओथेरपिस्ट महत्त्वाची भूमिका बजावतात. BPT कोर्स पूर्ण केल्यावर रुग्णालये, स्पोर्ट्स अकॅडमी, रिहॅबिलिटेशन सेंटर किंवा स्वतंत्र प्रॅक्टिस सुरु करता येते.

हे वाचा

फार्मसी (B.Pharm)

औषध क्षेत्र कधीही मागे राहत नाही. B.Pharm पूर्ण केल्यावर औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या, ड्रग रिसर्च संस्था, क्लिनिकल फार्मसी किंवा स्वतःचे मेडिकल स्टोअर चालवण्याची संधी मिळते. नव्या औषधांवर सतत संशोधन चालू असल्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांची मोठी मागणी आहे.

नर्सिंग व पैरामेडिकल कोर्सेस

आरोग्यसेवेचा पाया म्हणजे नर्सिंग आणि पैरामेडिकल क्षेत्र. रुग्णालयातील नर्स, लॅब टेक्निशियन, रेडिओलॉजिस्ट, अनेस्थेसिया तज्ज्ञ किंवा इमर्जन्सी सेवा देणारे तज्ज्ञ यांची मागणी जगभर वाढत आहे. विशेषतः परदेशात नर्सिंग क्षेत्रात प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी

दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात स्वावलंबी बनवणे किंवा ज्यांना बोलण्यात/श्रवणात अडचणी आहेत त्यांना मदत करणे हे ह्या क्षेत्रांचे काम आहे. समाजात फरक घडवण्याची ही एक वेगळी आणि समाधान देणारी करिअर वाट आहे.

फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिकल बायोटेक्नॉलॉजी

गुन्हेगारी मध्ये अजून एक डिपार्टमेंट महत्त्वाचा असतं ते म्हणजे, Forensic Science डिपार्टमेंट. तर Medical Biotechnology क्षेत्रात नवीन औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे तयार करण्याचे संशोधन केले जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा संगम असलेले हे क्षेत्र उच्च पगार आणि जागतिक पातळीवर संधी देतं.

हे वाचा

करिअर म्हणजे फक्त डॉक्टर किंवा इंजिनिअर होणं नाही, तर आपल्या आवडीनुसार योग्य दिशा निवडणं होय. MBBS किंवा BDS मध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे स्वप्न थांबत नाही, तर नव्या मार्गाने ते अधिक मोठं करता येतं. आज असंख्य वैद्यकीय कोर्सेस आहेत जे फक्त चांगला पगार देत नाहीत तर लोकांच्या जीवनात बदल घडवण्याची संधी देतात. लक्षात ठेवा मित्रानो, यशाचा मार्ग नेहमी एकाच दरवाजातून जात नाही, कधी कधी पर्यायी मार्गच तुम्हाला शिखरावर पोहोचवतो. त्यामुळे धाडसाने निर्णय घ्या आणि तुमचं उज्ज्वल भविष्य घडवा.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकायेथे क्लिक करा

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..