मित्रांनो, इतिहासाच्या पानांवर नजर टाकली की काही दिवस नेहमीच लक्षात राहतात. त्यातील एक खास दिवस म्हणजे 25 ऑगस्ट. या दिवशी विज्ञानात क्रांतिकारी शोध झाले, साम्राज्यांच्या लढाया घडल्या, महान व्यक्तींचा जन्म झाला आणि काहींच्या स्मृती अमर झाल्या. चला तर मग जाणून घेऊया, 25 ऑगस्टला घडलेल्या या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्वाच्या घटनांचा रोमांचक प्रवास.
25 ऑगस्ट महत्त्वाच्या घटना
- 1835: पहिला ग्रेट मून होक्स – चंद्रावर जीवन आहे असा शोध जाहीर करणारा लेख न्यूयॉर्क सनमध्ये प्रकाशित.
- 1933: डायक्सी भूकंप, चीन भूकंप (किमान ९००० लोकांचे निधन).
- 1940: ब्रिटीश रॉयल एअर फोर्सने पहिला बॉम्बहल्ला बर्लिन, जमर्नी शहरावर (दुसरे महायुद्ध)
- 1942: पूर्व सोलोमनची लढाई: जपानी नौदल वाहतूक काफिला मित्र राष्ट्रांच्या हवाई हल्ल्याने मागे वळला.(दुसरे महायुद्ध)
- 1981: अंतराळयान शनी ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले (व्हॉयेजर २).
- 1989: अंतराळयान नेपच्यून ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले (व्हॉयेजर २).
- 1991: सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र (बेलारुस).
- 1991: लिनक्स (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित (लिनस ट्रोव्हाल्डस).
- 2012: अंतराळयान आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू.(व्हॉयेजर १)
25 ऑगस्ट रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1530: इव्हान द टेरिबल (रशियन शासक)
- 1786: बव्हेरियाचा लुडविग पहिला (बावरिया देशाचे राजा)
- 1841: नोबेल पुरस्कार विजेते एमिल थिओडोर कोचर (स्विस चिकित्सक)
- 1850: नोबेल पुरस्कार विजेते चार्ल्स रिचेट (फ्रेंच फिजिओलॉजिस्ट, जादूगार)
- 1877: जोशुआ लिओनेल कोवेन (अमेरिकन उद्योगपती, लिओनेल कॉर्पोरेशन कंपनीचे सह-संस्थापक)
- 1882: सेन टी. ओ’केली (आयर्लंड देशाचे 2रे अध्यक्ष, आयरिश पत्रकार, राजकारणी)
- 1888: इनायतुल्ला खान मश्रिकी (पाकिस्तानी गणितज्ञ आणि अभ्यासक)
- 1900: नोबेल पुरस्कार विजेते हॅन्स ॲडॉल्फ क्रेब्स (जर्मन चिकित्सक, बायोकेमिस्ट)
- 1903: अर्पाद एलो (हंगेरियन-अमेरिकन बुद्धिबळपटू, एलो रेटिंग प्रणालीचे निर्माते)
- 1916: नोबेल पुरस्कार विजेते फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स (अमेरिकन बालरोगतज्ञ, विषाणूशास्त्रज्ञ)
- 1923: गंगाधर गाडगीळ (साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ)
- 1923: रीमा पिटिला (फिन्निश वास्तुविशारद, कालेवा चर्चचे सह-रचनाकार)
- 1924: सॅम्युअल बॉवर्स (सह-संस्थापक,अमेरिकन व्हाईट नाईट्स ऑफ द कु क्लक्स क्लॅनचे)
- 1928: नोबेल पुरस्कार विजेते हर्बर्ट क्रोमर (जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अभियंते)
- 1930: अभिनेता शॉन कॉनरी (जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला)
- 1936: गिरिधारीलाल केडिया (इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक) .
- 1941: अशोक पत्की (संगीतकार) .
- 1952: दुलीप मेंडिस (श्रीलंकेचा क्रिकेटपटू)
- 1957: सिकंदर बख्त (पाकिस्तानी जलदगती गोलंदाज)
- 1962: डॉ. तस्लिमा नसरीन (बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका)
- 1963: मिरो सरार (स्लोव्हेनिया देशाचे ८वे पंतप्रधान, स्लोव्हेनियन वकील, राजकारणी)
- 1965: संजीव शर्मा. (भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक)
- 1969: विवेक राजदान (भारतीय क्रिकेटपटू).
- 1976: जावेद कादीर (पाकिस्तानी क्रिकेटपटू, प्रशिक्षक)
- 1994: काजोल आयकट (भारतीय लेखक, कादंबरीकार)
25 ऑगस्ट रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 383: ग्रॅटियन (रोमन सम्राट)
- 1270: फ्रान्सचा राजा लुई (नववा)
- 1819: जेम्स वॅट (स्कॉटिश संशोधक)
- 1822: विल्यम हर्षेल (जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ)
- 1867: मायकेल फॅरेडे (इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ)
- 1886: झिनोव्हिओस व्हॅल्विस (ग्रीस देशाचे ३५वे पंतप्रधान, ग्रीक वकील, राजकारणी)
- 1908: हेन्री बेक्वेरेल (नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक)
- 1967: स्टॅनली ब्रुस (ऑस्ट्रेलिया देशाचे ८वे पंतप्रधान)
- 1970: ताचु नायतो (जपानी वास्तुविशारद आणि अभियंते, टोकियो टॉवरचे रचनाकार)
- 1976: नोबेल पुरस्कार विजेते आयविंड जॉन्सन (स्वीडिश कादंबरीकार आणि लघुकथा लेखक)
- 1988: आर्ट रूनी (अमेरिकन व्यावसायिकाने पिट्सबर्ग स्टीलर्सचे संस्थापक)
- 2000: कार्ल बार्क्स (डोनाल्ड डकचा जन्मदाता हास्यचित्रकार)
- 2001: डॉ. व. दि. कुलकर्णी (संतसाहित्याचे अभ्यासक, समीक्षक)
- 2001: केन टाइरेल (टायरेल रेसिंग चे संस्थापक)
- 2006: नूर हसनअली (त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे २रे अध्यक्ष, त्रिनिदादियन वकील, राजकारणी)
- 2008: सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज (उर्दू शायर)
- 2009: मांडे सिदिबे (माली देशाचे पंतप्रधान, मालियन अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी)
- 2012: नील आर्मस्ट्राँग (चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव)
- 2013: रघुनाथ पनिग्राही (भारतीय गायक)
विशेष दिवस (Special Day)
25 ऑगस्ट हा दिवस जगभरात वेगवेगळ्या कारणांसाठी साजरा केला जातो. या दिवशीचे काही खास दिवस पुढीलप्रमाणे आहेत.
- National Park Service Founders Day (USA) – अमेरिकेच्या राष्ट्रीय उद्यान सेवेची स्थापना २५ ऑगस्ट १९१६ रोजी झाली. त्यामुळे हा दिवस निसर्गसंवर्धन आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
- National Banana Split Day (USA) – अमेरिकेत हा दिवस खास केळ्याच्या डेझर्टसाठी म्हणजेच “Banana Split” या डिशसाठी ओळखला जातो. लोक या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे बनाना स्प्लिट खाऊन साजरा करतात.
- उरूस दिन (भारत व इतर देशांतील काही भागात) – धार्मिक महत्त्वाचा दिवस. विविध दर्गे आणि मशिदींमध्ये श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी होतात.
मित्रांनो इतिहास, विज्ञान, संस्कृती आणि समाज या सगळ्या क्षेत्रांत 25 ऑगस्टचा दिवस प्रेरणादायी ठरतो. या दिवशी झालेल्या घटना आपल्याला आठवण करून देतात की ज्ञान, परिश्रम आणि एकजूट यांच्यामध्येच खरी ताकद असते. प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात नवा बदल घडवून आणण्याची संधी देतो. चला तर, 25 ऑगस्टसारख्या दिवसांपासून प्रेरणा घेऊया आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी उत्साहाने, जिद्दीने आणि सकारात्मकतेने पुढे वाटचाल करूया.







