प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवी प्रेरणा, नवा इतिहास आणि नव्या आठवणी घेऊन येतो. ३ सप्टेंबर या दिवशी जगभरात घडलेल्या घटना, महान व्यक्तींचा जन्म आणि पुण्यतिथी यामुळे हा दिवस ऐतिहासिक ठरतो. काहींनी या दिवशी स्वातंत्र्य मिळवलं, काहींनी विज्ञानात झेप घेतली तर काहींनी कलेच्या माध्यमातून समाज उजळून टाकला. चला तर मग जाणून घेऊया ३ सप्टेंबरच्या दिनविशेषातून इतिहासाचे ते अनमोल क्षण जे आजही आपल्याला प्रेरणा देतात.
3 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना
- 301: ई.पूर्व. जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित.
- 1752: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू.
- 1916: श्रीमती ॲनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापन केले.
- 1935: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति.
- 1971: कतारला स्वातंत्र्य.
- 2022: आर्टेमिस १ रॉकेट – इंधन गळतीमुळे दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने नासाने आर्टेमिस १ रॉकेटचे प्रक्षेपण दुसऱ्यांदा स्थगित.
3 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1855: पंत महाराज बाळेकुंद्री (आध्यात्मिक गुरू)
- 1869:नोबेल पारितोषिक विजेते फ्रिट्झ प्रेग्ल (सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ)
- 1875: फर्डिनांड पोर्श्या
- (पोर्श्या मोटार कंपनी चे संस्थापक)
- 1905: नोबेल पारितोषिक विजेते कार्ल डेव्हिड अँडरसन (अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ).
- 1923: किशन महाराज (तबलावादक)
- 1923: ग्लेन बेल
- (टाको बेल चे संस्थापक)
- 1923: महाराष्ट्र शाहीर कृष्णराव म्हणजेच शाहीर साबळे
- 1927: अरुण कुमार चटर्जी म्हणजेच उत्तम कुमार (बंगाली, हिन्दी चित्रपट अभिनेते)
- 1931: श्याम फडके (नाटककार)
- 1938: नोबेल पारितोषिक विजेते रायोजी नोयोरी (जपानी रसायनशास्त्रज्ञ)
- 1940: प्यारेलाल शर्मा (लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार) .
- 1956: जिझु दासगुप्ता (भारतीय अभिनेते, दिग्दर्शक)
- 1965: चार्ली शीन (अमेरिकन अभिनेता)
- 1971: किरण देसाई (भारतीय-अमेरिकन लेखक).
- 1974: राहुल संघवी (भारतीय क्रिकेटपटू).
- 1976: विवेक ओबेरॉय (चित्रपट अभिनेता).
- 1948: लेवी मवानवासा (झांबिया देशाचे ३रे राष्ट्रपती, वकील, राजकारणी)
- 1942: निपॉन गोस्वामी (भारतीय अभिनेते)
- 1935: शरद अनंतराव जोशी (भारतीय शेतकरी, राजकारणी)
- 1928: गेस्टन थॉर्न
- (लक्झेंबर्ग देशाचे २०वे पंतप्रधान, न्यायशास्त्रज्ञ, राजकारणी)
- 1728: मॅथ्यू बोल्टन (इंग्लिश व्यापारी, अभियंते, बोल्टन आणि वॅटचे सह-संस्थापक)
3 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 1658: ऑलिव्हर क्रॉमवेल (इंग्लंडचा राज्यकर्ता)
- 1948: एडवर्ड बेनेस (चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष)
- 1953: लक्ष्मण म्हणजेच खाप्रुमामा पर्वतकर (तबला, घुमट, सारंगीवादक)
- 1958: माधव केशव काटदरे (निसर्गकवी)
- 1967: अनंत हरी गद्रे म्हणजेच समतानंद (वार्ताहर, संपादक)
- 1991: फ्रँक काप्रा (अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक)
- 2000: पुरुषोत्तम शिरोडकर (स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग)
- 2005: विल्यम रेहनक्विस्ट (अमेरिकन वकील, कायदेतज्ज्ञ, अमेरिका देशाचे १६वे मुख्य न्यायाधीश)
- 2007: स्टीव्ह फॉसेट (अमेरिकन वैमानिक, ग्लोबल फायर या फुग्या मधून उड्डाण केले आणि पॅसिफिक महासागर एकट्याने न थांबता ओलांडणारे पहिले)
- 2014: ए. पी. वेंकटेश्वरन (भारतीय राजकारणी)
विशेष दिवस (Special Day)
- ३ सप्टेंबर हा दिवस काही देशांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा दिवस Australian National Flag Day म्हणून साजरा केला जातो, कारण १९०१ साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय झेंडा फडकवण्यात आला होता. तर कतारमध्ये हा दिवस Independence Day म्हणून पाळला जातो, कारण १९७१ साली कतारला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय अभिमान, स्वातंत्र्य आणि ऐतिहासिक वारसा जपणारा दिवस म्हणून जगभर स्मरणात राहतो.







