मित्रांनो बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) तर्फे अखिल भारतीय बार परीक्षा म्हणजेच AIBE 20 परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र आज, 15 नोव्हेंबर 2025 रोजी जारी होणार आहे. ज्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते उमेदवार अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर जाऊन आपले AIBE 20 Hall Ticket 2025 डाउनलोड करू शकतील.
Website आणि डाउनलोड प्रक्रिया?
- AIBE 20 Admit Card डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- होमपेजवर उपलब्ध असलेल्या “AIBE 20 Admit Cards 2025” या लिंकवर क्लिक करून, आपले लॉगिन क्रेडेन्शियल म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
- त्याचा प्रिंटआउट काढणे हीही महत्त्वाची प्रक्रिया आहे.
परीक्षा दिनांक आणि वेळ
BCI तर्फे AIBE 20 परीक्षा देशभरातील निवडलेल्या केंद्रांवर 30 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा दुपारी 1 वाजता सुरू होऊन 4 वाजेपर्यंत चालेल. सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त 11:30 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे.
उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे गुण
AIBE 20 परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना किमान 45 गुण मिळणे आवश्यक आहे. तर अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 40 टक्के गुण मिळणे बंधनकारक आहे. हे गुण मिळाल्यास उमेदवार AIBE 20 परीक्षेत यशस्वी ठरतात.
मित्रांनो सध्या BCI ने प्रवेशपत्र अद्याप अधिकृतरीत्या जारी केलेले नाही. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर नियमित भेट देणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र डाउनलोड झाल्यानंतर त्यावरील सर्व सूचना नीट वाचाव्यात आणि परीक्षेशी संबंधित कोणतीही चूक टाळावी.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.






