भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, गुवाहाटी (Indian Institute of Technology Guwahati) यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या ग्रॅज्युएट एप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE 2026) परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Admit Card) आज जारी होणार नव्हते. आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार आज प्रवेशपत्र जाहीर होणे अपेक्षित होते, मात्र काही कारणांमुळे ते तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

प्रवेशपत्राबाबत नवीन अपडेट

IIT गुवाहाटी लवकरच नवीन तारीख अधिकृत वेबसाइटवर जाहीर करणार आहे. उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत वेबसाइट तपासत राहावे. नवीन तारखेनुसार प्रवेशपत्र ऑनलाइन डाउनलोड करता येईल.

मॉक टेस्ट लिंक active झाली आहे,

GATE 2026 साठी मॉक टेस्टची लिंक अधिकृत वेबसाइटवर लाईव्ह करण्यात आली आहे.

उमेदवार आता मॉक टेस्ट देऊन,

  • संगणक आधारित परीक्षेचा (CBT) अनुभव घेऊ शकतात
  • प्रश्नांचा प्रकार समजू शकतात
  • वेळ व्यवस्थापनाची सराव करू शकतात
  • हे मॉक टेस्ट परीक्षा तयारी अधिक मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

GATE 2026 परीक्षा व निकाल तारीखा

घटकतारीखअतिरिक्त माहिती
GATE 2026 परीक्षा (पहिला टप्पा)07 फेब्रुवारी 2026संगणक आधारित परीक्षा (CBT)
GATE 2026 परीक्षा (दुसरा टप्पा)08 फेब्रुवारी 2026देशभरातील परीक्षा केंद्रांवर
GATE 2026 परीक्षा (तिसरा टप्पा)14 फेब्रुवारी 2026वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा
GATE 2026 परीक्षा (चौथा टप्पा)15 फेब्रुवारी 2026Computer Based Test (CBT)
GATE 2026 निकाल जाहीर19 मार्च 2026ऑनलाइन पद्धतीने

GATE Admit Card 2026 कसे डाउनलोड करावे?

प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर खालील स्टेप्स फॉलो करा,

  • अधिकृत GATE वेबसाइटला भेट द्या
  • होमपेजवर Admit Card सेक्शनवर क्लिक करा.
  • “GATE Admit Card 2026” या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स (Enrollment ID / Password) टाका.
  • स्क्रीनवर प्रवेशपत्र दिसेल
  • प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंटआउट काढून ठेवा.