मित्रांनो UGC NET डिसेंबर 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत वेबसाइटवरूनच Admit Card डाउनलोड करावे.
परीक्षा आयोजनाच्या तारखा
UGC NET डिसेंबर 2025 परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा 31 डिसेंबर 2025, तसेच 2, 3, 5, 6 आणि 7 जानेवारी 2026 रोजी घेतली जाणार आहे. सर्व उमेदवारांनी आपल्या Admit Card वर नमूद केलेली परीक्षा तारीख आणि केंद्र नीट तपासणे आवश्यक आहे.
Admit Card डाउनलोड करण्याची प्रक्रिया
- UGC NET Admit Card 2025 डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- होमपेजवरील LATEST NEWS विभागात दिलेल्या Admit Card for UGC-NET December 2025 या लिंकवर क्लिक करावे.
- त्यानंतर Application Number, Password आणि Security Pin टाकून Login करावे.
- Login झाल्यानंतर Admit Card स्क्रीनवर दिसेल, जे डाउनलोड करून प्रिंट काढता येईल.
सध्या कोणत्या तारखेचे Admit Card जारी झाले आहेत?
सध्या फक्त 31 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी Admit Card जारी करण्यात आले आहेत. उर्वरित परीक्षा तारखांसाठी संबंधित परीक्षेच्या चार दिवस आधी Admit Card उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे वेबसाइट तपासत राहणे गरजेचे आहे.
UGC NET परीक्षा वेळापत्रक
UGC NET परीक्षा दररोज दोन शिफ्टमध्ये आयोजित केली जाणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 9:00 ते दुपारी 12:00 या वेळेत होईल, तर दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते सायंकाळी 6:00 या वेळेत पार पडेल. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर वेळेआधी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
परीक्षा केंद्रावर आवश्यक कागदपत्रे
- परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांनी UGC NET Admit Card आणि एक वैध ओळखपत्र अनिवार्यपणे सोबत ठेवावे.
- ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरले जाईल.
- या कागदपत्रांशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
| UGC NET Admit Card 2025 Download Link | CLICK HERE |




