मित्रांनो राज्यातील बी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीचे जागा वाटप अखेर जाहीर झाले आहे. राज्य सीईटी सेलने जाहीर केलेल्या निकालानुसार, या फेरीत एकूण 29,166 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फार्मसी क्षेत्रात विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आहे.
या वर्षी बी. फार्मसी अभ्यासक्रमासाठी 55,116 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, त्यापैकी 38,462 उमेदवारांनी पर्यायक्रम भरला. त्यातून 29,166 विद्यार्थ्यांना जागा वाटप झाले, तर 14,121 उमेदवारांना जागा मिळालेल्या नाहीत. विशेष म्हणजे, 13,895 विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला असून, त्यांचे प्रवेश आपोआप ‘ऑटो फ्रीज’ झाले आहेत.
पहिल्या फेरीचे अलॉटमेंट 3 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले. उमेदवारांना 4 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत जागा स्वीकारणे, फ्रीज किंवा बेटरमेंट पर्याय निवडणे, तसेच शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी 6 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करावी लागेल.
राज्यातील बी. फार्मसीसाठी एकूण 44,287 जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीत काही जागा रिक्त राहिल्याने आता दुसऱ्या फेरीसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. रिक्त जागांची यादी 7 ऑक्टोबरला जाहीर केली जाईल, तर पर्यायक्रम 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सादर करता येईल. दुसऱ्या फेरीचे अलॉटमेंट 13 ऑक्टोबर 2025 रोजी घोषित होईल. राज्य सीईटी सेलने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, पहिल्या फेरीत जागा न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करावा. सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करून प्रवेश निश्चित करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..





