BAMU University Exam Cancelled 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (BAMU) पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू होण्याच्या काही तास आधीच पुढे ढकलण्याचा धक्कादायक निर्णय घेतला असून 18 नोव्हेंबरपासून होणाऱ्या या परीक्षा आता 15 डिसेंबरपासून घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाने केलेल्या या अचानक घोषणेने तब्बल 87 हजार विद्यार्थी, प्राध्यापक आणि 488 संलग्नीत महाविद्यालयांचे प्रशासन मोठ्या गोंधळात सापडले आहे. विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट वाटप, परीक्षेची बैठक व्यवस्था आणि महाविद्यालयातील तयारी पूर्ण झाल्यानंतरच हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या निर्णयामागे प्रमुख कारण म्हणजे प्रशासकीय तयारी पूर्ण न होणे असे सांगितले जाते. NEP-2020 नुसार ‘होम सेंटर – होम असessment’ पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी लागणारी तांत्रिक प्रक्रिया अद्याप प्रलंबित होती. याशिवाय 87 हजारांपैकी फक्त 47 हजार विद्यार्थ्यांचेच हॉलतिकीट तयार झाले होते, उर्वरित विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट तयार करण्याचे काम सुरू होते. अनेक महाविद्यालयांकडून परीक्षा अर्ज शेवटच्या क्षणी मिळाल्याने तब्बल 8,000 विद्यार्थ्यांचे अर्ज आडून पडले आणि त्यांचे हॉलतिकीट अद्याप तयार झाले नव्हते. हॉलतिकीट जनरेट करण्यास किमान 24 तास लागू लागतात, त्यामुळे परीक्षा वेळेत सुरू करणे शक्य नव्हते.
विद्यापीठामध्ये सध्या पॅटर्न 2013, 2014, 2018, 2019, 2022 आणि NEP-2024 अशा विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा एकत्र सुरू आहेत. मोठ्या प्रमाणातील या परीक्षा व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले समन्वय आणि तांत्रिक तयारी अपुरी राहिल्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले. विद्यापीठाने जाहीर केलेल्या पत्रानुसार सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होईल.
परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षेचे नियोजन विस्कळीत झाले असले तरी आता त्यांना अतिरिक्त तयारीची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सर्व परीक्षा 29 डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन कायम आहे.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.






