मित्रांनो दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) कडून 2025 साली एक नवीन भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी अर्ज मागवले गेले आहेत. प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची इच्छा असलेल्या आणि तांत्रिक क्षेत्रातील अनुभवी अधिकाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2025 आहे.

हे वाचा

या भरतीसाठी एकूण 02 पदे जाहीर करण्यात आली आहेत. अर्ज करणारे उमेदवार IRSEE/पूर्व IRSEE अधिकारी असणे आवश्यक आहे. डेप्युटेशन बेसिससाठी अर्ज करणारे अधिकारी सध्या सरकारी संस्था किंवा सार्वजनिक उपक्रमांमध्ये CDA वेतनमान स्तर 14 (1,44,200 ते 2,18,200) वर कार्यरत असावेत. तर PRCE बेसिससाठी या स्तरावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी पात्र आहेत.

वेतनाच्या बाबतीत दिल्ली मेट्रो उत्कृष्ट पॅकेज देत आहे. डेप्युटेशन बेसिसवर निवड झालेल्यांना मूळ विभागाचे वेतन आणि प्रतिनियुक्ती भत्ता मिळून पगार दिला जाईल. PRCE अंतर्गत निवड झालेल्या अधिकाऱ्यांना दरमहा 1,65,900 रुपये पर्यंत वेतन मिळेल.

वयमर्यादा देखील अनुकूल ठेवण्यात आली आहे. सामान्य उमेदवारांसाठी वयोमर्यादा 55 वर्षे, तर PRCE अंतर्गत सेवानिवृत्त उमेदवारांसाठी 62 वर्षे पर्यंत अर्ज करता येतो. निवड प्रक्रिया स्क्रीनिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या दोन टप्प्यांतून होईल.

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. उमेदवारांनी नोटिफिकेशनमधील फॉर्म डाउनलोड करून भरावा, आवश्यक कागदपत्रे जोडावीत आणि अर्ज स्पीड पोस्टद्वारे खालील पत्त्यावर पाठवावा
General Manager (HR), Projects, DMRC Ltd., Metro Bhawan, Fire Brigade Lane, Barakhamba Road, New Delhi.

हे वाचा

ही भरती अनुभवी अभियंत्यांसाठी स्थैर्य आणि उच्च पगाराची उत्कृष्ट संधी आहे. रिटायर झालेले अधिकारीदेखील अर्ज करू शकतात, त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग दिल्ली मेट्रोच्या प्रकल्पांमध्ये होऊ शकतो. प्रतिष्ठित संस्थेत करिअर घडवायचे असल्यास ही संधी नक्की वापरा.

महत्त्वाची लिंकलिंक
अधिकृत भरती अधिसूचना (Notification PDF)click here
दिल्ली मेट्रो अधिकृत वेबसाइटclick here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.