मित्रांनो तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या या युगात, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) ही आता भविष्याची नाही, तर वर्तमानाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांना या नव्या तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी NCERT (National Council of Educational Research and Training) ने एक उपक्रम सुरू केला आहे. ५ दिवसांची मोफत ऑनलाईन AI Training Series. हा कार्यक्रम विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला असून, त्याचा उद्देश त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडणे आहे.

ही एआय ट्रेनिंग सिरीज २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. दररोज सकाळी ९ ते १० या वेळेत सत्रे घेण्यात येतील. सर्व सत्रे पूर्णपणे ऑनलाईन असून ती NCERT च्या अधिकृत YouTube Channel वर थेट पाहता येतील. त्यामुळे देशभरातील विद्यार्थी सहज सहभागी होऊ शकतील. या कार्यक्रमाचं आयोजन CIET, NCERT, नवी दिल्ली यांच्या सहयोगाने करण्यात आलं आहे.

हे वाचा

या ५ दिवसांच्या सिरीजचं मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मूलभूत संकल्पना समजावून सांगणे आणि त्याचा प्रत्यक्ष वापर शिकवणे आहे. विद्यार्थ्यांना Orange Data Mining, Teachable Machine, Magic School AI, GenApp आणि DeckPilot यांसारख्या एआय टूल्सबद्दल शिकवले जाणार आहे. या साधनांच्या मदतीने विद्यार्थी डेटा विश्लेषण, मशीन लर्निंग आणि प्रोजेक्ट क्रिएशन सारखी व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करू शकतील.

नोंदणी प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करावी.

🖇️ नोंदणीसाठी येथे क्लिक करा


नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे पुष्टी मिळेल. शिक्षकांनाही आवाहन करण्यात आलं आहे की त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावं, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना एआय शिकण्याची संधी मिळेल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या आणि सर्व ५ सत्रं पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना NCERT कडून प्रमाणपत्र (Participation Certificate) दिलं जाणार आहे. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासात एक महत्त्वपूर्ण ओळख ठरेल आणि त्यांचं आत्मविश्वास वाढवेल.

हे वाचा

अधिक माहितीसाठी विद्यार्थी आणि शिक्षक [email protected] या मेलवर संपर्क करू शकतात किंवा CIET NCERT च्या वेबसाइटला भेट देऊ शकतात. ही संधी म्हणजे फक्त प्रशिक्षण नाही, तर भविष्यातील तंत्रज्ञानाचा पाया आहे. जर तुम्ही एआयच्या जगात करिअर करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर ही कार्यशाळा तुमच्यासाठीच आहे. आजच नोंदणी करा आणि “AI Learner to AI Leader” या प्रवासाला सुरुवात करा.