येवला तालुक्यातील राजापूर येथील हवालदार वस्ती प्राथमिक शाळेत शिक्षकांची गंभीर टंचाई निर्माण झाली असून यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेत पहिली ते चौथी असे चार वर्ग असून फक्त एकच शिक्षक कार्यरत आहे. पूर्वी दोन शिक्षक होते, परंतु एका शिक्षकाची बदली झाल्यानंतर नव्याने आलेल्या शिक्षिका दोनच दिवस हजर राहिल्या आणि तत्काळ तीन महिन्यांची रजा घेऊन गेल्या. परिणामी सर्व अध्यापन, प्रशासकीय कामे, मुख्याध्यापकांची जबाबदारी आणि BLO चे कर्तव्य असा प्रचंड ताण एका शिक्षकावर आला आहे.
या परिस्थितीमुळे पालकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार केली, परंतु शिक्षक मिळाला नाही. अखेर विद्यार्थी व पालकांनी थेट पंचायत समिती कार्यालयात शाळाच भरवली. विद्यार्थी तिथेच जेवणाचे डबे खात “शिक्षक द्या शिक्षक!” अशी घोषणा देत अनोखे आंदोलन करत बसले. त्यांनी स्पष्ट सांगितले की शिक्षक मिळेपर्यंत आम्ही उठणार नाही. स्थानिक कार्यकर्ते आणि पालक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.
गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी सांगितले की पटसंख्या कमी असल्याने नवीन शिक्षक नियुक्त करणे कठीण आहे, मात्र प्रयत्न केले जातील. पालकांनी चेतावणी दिली की शिक्षक न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..





