मित्रांनो वर्किंग प्रोफेशनल्ससाठी जगभरात Executive MBA (EMBA) हा कोर्स सर्वात लोकप्रिय ठरत आहे. नोकरी करत असतानाच मॅनेजमेंट क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची आणि करिअरमध्ये झेप घेण्याची ही एक उत्तम संधी मानली जाते. Financial Times ने नुकतीच Executive MBA Ranking 2025 जाहीर केली असून यामध्ये काही मोठ्या बिझनेस स्कूल्सने पहिल्या दहामध्ये स्थान मिळवलं आहे.

या वर्षीच्या रँकिंगमध्ये Washington University–Fudan ने सर्वाधिक झेप घेत पहिलं स्थान पटकावलं आहे. ही जोडी चीनमधील Fudan University आणि अमेरिकेतील Washington University’s Olin Business School यांच्या संयुक्त कार्यक्रमातून चालवली जाते. 2024 मध्ये हे प्रोग्राम तिसऱ्या क्रमांकावर होते, तर यावर्षी त्यांनी थेट पहिलं स्थान मिळवत CEIBS (China Europe International Business School) ला मागे टाकलं आहे.

हे वाचा

या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर CEIBS, तिसऱ्या स्थानावर ESCP बिझनेस स्कूल, तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे Kellogg–HKUST आणि SKEMA बिझनेस स्कूल आहेत. TRIUM (HEC Paris/LSE/NYU Stern), INSEAD, Fudan University School of Management, Arizona State University आणि Guanghua–Kellogg यांनीही टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं आहे.

Financial Times ने ही रँकिंग तयार करताना विद्यार्थ्यांच्या सैलरी ग्रोथ, करिअर प्रगती आणि फॅकल्टीच्या रिसर्च क्वालिटी या घटकांचा सखोल अभ्यास केला. या प्रक्रियेत 129 प्रोग्राम्सचा विचार करण्यात आला आणि 100 विद्यापीठांनी AACSB आणि EQUIS या आंतरराष्ट्रीय मान्यता निकषांची पूर्तता केली. या सर्व रँकिंगमधून एक गोष्ट स्पष्ट होते. Executive MBA हे फक्त शिक्षण नाही, तर करिअरला नव्या उंचीवर नेणारा जागतिक अनुभव आहे.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..