मित्रांनो GATE 2026 परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. IIT Guwahati ने अखेर गेट परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ज्या उमेदवारांनी या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते आता अधिकृत वेबसाइटवर जाऊन विषयानुसार परीक्षा वेळापत्रक पाहू शकतात. गेट परीक्षा विविध अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आर्किटेक्चर आणि सायन्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

हे वाचा

GATE 2026 परीक्षा कधी होणार?

परीक्षेची तारीखदिवस
07 फेब्रुवारी 2026शनिवार
08 फेब्रुवारी 2026रविवार
14 फेब्रुवारी 2026शनिवार
15 फेब्रुवारी 2026रविवार

IIT Guwahati च्या माहितीनुसार GATE 2026 परीक्षा चार दिवसांमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षा 07 फेब्रुवारी, 08 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित केली जाईल. या दरम्यान विविध विषयांची परीक्षा वेगवेगळ्या वेळेत आणि दिवशी होणार आहे. उमेदवारांनी आपल्याला लागू असलेला विषय कोणत्या दिवशी आहे हे अधिकृत वेबसाइटवरून तपासावे.

परीक्षा कोणत्या सत्रात होणार?

परीक्षा सत्रवेळ
पहिली पालीसकाळी 9:30 ते दुपारी 12:30
दुसरी पालीदुपारी 2:30 ते संध्याकाळी 5:30

प्रत्येक पालीमध्ये विविध विषयांचे पेपर घेतले जातील. त्यामुळे उमेदवारांनी आपापल्या अ‍ॅडमिट कार्डवर दिलेल्या वेळेनुसार परीक्षेला उपस्थित राहणे गरजेचे आहे.

GATE 2026 Result कधी जाहीर होणार?

GATE ची परीक्षा संपल्यानंतर सर्व उमेदवार ज्या गोष्टीची सर्वाधिक वाट पाहतात ती म्हणजे रिझल्ट घोषणा. IIT Guwahati च्या शेड्यूलनुसार 19 मार्च 2026 रोजी GATE 2026 चे रिझल्ट प्रकाशित केले जाणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर आपला एन्ऱोलमेंट नंबर आणि पासवर्डच्या मदतीने रिझल्ट पाहू शकतील.

हे वाचा

GATE 2026 परीक्षेचा पॅटर्न (Exam Pattern)

घटकतपशील
एकूण विषय30
पेपरची निवड1 किंवा 2 विषय
परीक्षा कालावधी3 तास
प्रश्न प्रकारMCQ, MSQ, NAT
एकूण प्रश्न100
General Aptitude प्रश्न15
विषय (Core) प्रश्न85
निगेटिव्ह मार्किंगMCQ मध्ये लागू, MSQ आणि NAT मध्ये नाही

प्रश्नांचे विभाजन

एकूण 100 प्रश्न असतात, ज्यामध्ये

विषयप्रश्नांची संख्यागुण
General Aptitude (GA)15 प्रश्न15 गुण
Core Subject (निवडलेला विषय)85 प्रश्न85 गुण
एकूण100 प्रश्न100 गुण

General Aptitude हा सर्व विषयांसाठी कॉमन असतो आणि त्याला एकूण 15 गुण दिले जातात. उर्वरित 85 गुण निवडलेल्या विषयासाठी असतात.

निगेटिव्ह मार्किंगची माहिती

  • GATE परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंगची तरतूद आहे.
  • MCQ प्रश्नांमध्ये निगेटिव्ह मार्किंग लागू असेल.
  • मात्र MSQ आणि NAT प्रकारातील प्रश्नांमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते.
  • त्यामुळे उमेदवारांनी विचारपूर्वक उत्तर देणे अत्यंत आवश्यक आहे.
हे वाचा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकायेथे क्लिक करा

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..