IBPS PO Mains Admit Card 2025 अखेर जाहीर झाला आहे. बँकिंग क्षेत्रात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही खूप मोठी बातमी आहे. आता फक्त काही दिवसांवर आलेली ही महत्त्वाची परीक्षा 12 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. जर तुम्ही या संधीची आतुरतेने वाट पाहत असाल, तर लगेचच तुमचे Admit Card ibps.in वरून डाउनलोड करा आणि परीक्षेच्या रणांगणात उतरण्यास सज्ज व्हा.
परीक्षा दिनांक
IBPS च्या माहितीनुसार, PO Mains परीक्षा 12 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांसाठी बँकिंग क्षेत्रातील संधींचे दरवाजे उघडतील.
ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया काय आहे?
- Admit Card डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम ibps.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- त्यानंतर PO Mains Admit Card 2025 या लिंकवर क्लिक करून आपले Registration Number व Password/जन्मतारीख टाकावी.
- माहिती भरल्यानंतर एडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
- ते PDF स्वरूपात डाउनलोड करून त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे.
ॲडमिट कार्डवरील माहिती
हॉल तिकीटामध्ये उमेदवाराचे नाव, रोल नंबर, परीक्षा दिनांक, वेळ, शिफ्ट, परीक्षा केंद्राचा पत्ता व परीक्षेसाठी आवश्यक सूचना नमूद असतात. या सर्व माहितीची खात्री करून घ्यावी.
परीक्षा केंद्रातील नियम व अटी
परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी उमेदवारांनी Admit Card सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा इतर कोणतेही वैध फोटो ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. तसेच मोबाईल फोन, स्मार्टवॉच, कॅलक्युलेटर, जियोमेट्री बॉक्स किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे.
महत्त्वाची सूचना
IBPS च्या सूचनेनुसार, Admit Card आणि ओळखपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांनी आपली कागदपत्रे वेळेत तयार ठेवावीत.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.






