मित्रांनो सीए (CA )बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता प्रतीक्षेची घडी जवळ आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) लवकरच CA September 2025 परीक्षा निकाल जाहीर करणार आहे. फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल या तिन्ही स्तरांवरील परीक्षांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना तो ICAI च्या अधिकृत वेबसाइटवर icai.org आणि icai.nic.in उपलब्ध होईल.

सध्या सोशल मीडियावर निकालाच्या तारखेबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. ICAI चे सदस्य राजेश शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, निकाल नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. पण, अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मागील वर्षी निकाल 30 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित झाला होता, त्यामुळे यंदाही निकाल याच कालावधीत येईल, असा अंदाज आहे.

हे वाचा

CA September 2025 परीक्षा वेळापत्रकानुसार फाउंडेशन परीक्षा 16, 18, 20 आणि 22 सप्टेंबर रोजी झाली. इंटरमीडिएट ग्रुप 1 परीक्षा 4, 7 आणि 9 सप्टेंबरला तर ग्रुप 2 परीक्षा 11, 13 आणि 15 सप्टेंबरला घेण्यात आली. फायनल परीक्षांसाठी ग्रुप 1 परीक्षा 3, 6 आणि 8 सप्टेंबरला, तर ग्रुप 2 परीक्षा 10, 12 आणि 14 सप्टेंबर 2025 रोजी पार पडली.

निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी icai.nic.in वर लॉगिन करून आपला Registration Number आणि Roll Number टाकावा लागेल. त्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल आणि तो PDF स्वरूपात डाउनलोड करता येईल.

ICAI कडून निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कोअरकार्डसह मेरिट लिस्ट पाहता येईल. निकालाबाबत अधिकृत माहिती आणि अपडेट्ससाठी उमेदवारांनी ICAI च्या वेबसाइटवर नियमितपणे भेट देणे आवश्यक आहे.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..