मित्रांनो भारतीय रेल्वे म्हणजे लाखो युवांचा स्वप्नांचा मार्ग आहे. सरकारी नोकरी, चांगल करिअर आणि दर्जेदार सुविधांमुळे इथल्या प्रत्येक पदाकडे तरुणाईचं लक्ष असतं. त्यातही Indian Railway Train Clerk Job हा असा पद आहे, जो युवांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ट्रेनची वेळ, मालगाड्यांची हालचाल, स्टेशनवरील महत्त्वाच्या नोंदी आणि रेल्वे ऑपरेशन्सचा गाभा हाताळण्याची जबाबदारी या पदावर असते. सर्वात खास म्हणजे, 12वी पास उमेदवारही या पोस्टसाठी पात्र आहेत आणि सध्या या पदाची भरतीही सुरू आहे. म्हणून आजच जाणून घ्या. ट्रेन क्लर्कची माहिती, पगार, पात्रता आणि निवड प्रक्रिया.

हे वाचा

Indian Railway Train Clerk Job: 12वी पासला सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पगार, काम, पात्रता आणि भरती माहिती

ट्रेन क्लर्क म्हणजे कोण?

ट्रेन क्लर्क हा भारतीय रेल्वेच्या कमर्शियल विभागातील एक महत्त्वाचा कर्मचारी असतो. स्टेशनवर येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक, लोडिंग- अनलोडिंग, मालाची माहिती, तसेच यासंबंधित रिपोर्ट आणि रेकॉर्ड्स ठेवण्याची जबाबदारी या पदावर असते. ट्रेन क्लर्क बहुतेक छोटे, मध्यम स्टेशन, माल डिपो किंवा स्टेशन मास्टर ऑफिसमध्ये काम करतात. या पदावर असणाऱ्यांना शारीरिक श्रमापेक्षा जास्त प्रशासकीय आणि डॉक्युमेंटेशन संबंधित कामावे लागते. रेल्वेमधील स्थिर नोकरी, प्रगतीच्या संधी आणि सरकारी सुविधामुळे हा पद अनेक युवकांसाठी आकर्षक मानला जातो.

ट्रेन क्लर्क होण्यासाठी पात्रता काय आहे?

ट्रेन क्लर्क पदासाठी अर्ज करणाऱ्याने मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असणे आवश्यक आहे. सामान्य प्रवर्गासाठी किमान 50% गुण आवश्यक असतात; परंतु राखीव प्रवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये सूट मिळते. वयोमर्यादा सामान्यतः 18 ते 30 वर्षे असते आणि OBC, SC/ST उमेदवारांना वयात शिथिलता मिळते. उमेदवाराकडे संगणक ज्ञान, मूलभूत टायपिंग व रेकॉर्ड मॅनेजमेंट कौशल्य असणे फायदेशीर ठरते. हे पद नॉन-टेक्निकल असल्याने कोणत्याही विशिष्ट शाखेची गरज नसते, त्यामुळे 12वी नंतर सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

हे वाचा

ट्रेन क्लर्कची सैलरी व सुविधा

घटकमाहिती
पदट्रेन क्लर्क (Train Clerk)
पे लेव्हललेव्हल-2 (7th Pay Commission)
सुरुवातीची बेसिक पे (Basic Pay)19,900 रुपये प्रति महिना
Dearness Allowance (DA)सरकारनुसार लागू (Basic वर % प्रमाणात)
House Rent Allowance (HRA)शहराच्या वर्गवारीनुसार (X/Y/Z)
Transport Allowance (TA)निर्धारित दरानुसार
Medical Facilitiesरेल्वे हॉस्पिटल व मेडिकल सुविधा
Travel Passफ्री/कन्सेशन ट्रेन ट्रॅव्हल पास
पगार हातात (Approx Net Salary)28,000 ते ₹32,000 रुपये प्रति महिना
प्रमोशनसीनियर क्लर्क – चीफ क्लर्क – सुपरवायझर
इतर सुविधाNPS, जॉब सिक्युरिटी, लीव्ह बेनिफिट, क्वार्टर

सुरुवातीला ट्रेन क्लर्कची बेसिक पगार संरचना 19,900 रुपये आहे. याशिवाय रेल्वेकडून विविध भत्ते जसे की DA, HRA, TA आणि इतर सुविधा मिळतात. त्यामुळे प्रत्यक्ष हातात मिळणारा पगार यापेक्षा जास्त असतो आणि अनुभव तसेच प्रमोशन मिळत गेल्यास पगारात सातत्याने वाढ होते. नोकरीसोबत स्थिरता, पेन्शन योजना (NPS), मेडिकल लाभ, रेल्वे ट्रॅव्हल पास आणि कौटुंबिक फायदे मिळतात. सरकारी नोकरीची सुरक्षितता व नियमित वाढीचे फायदे पाहता अनेक युवकांसाठी हा पगार पैकेज खूप आकर्षक ठरतो.

ट्रेन क्लर्कचे काम व जबाबदाऱ्या

ट्रेन क्लर्कचे प्रमुख काम म्हणजे ट्रेनच्या आगमन व प्रस्थानाची नोंद ठेवणे, मालगाड्यांच्या लोडिंग- अनलोडिंगची माहिती सांभाळणे आणि त्यांच्याशी संबंधित रिपोर्ट तयार करणे. स्टेशनवरील माल व्यवहार, वखार विभाग आणि स्टेशन मास्टर यांच्यासोबत समन्वय साधून काम करावे लागते. काही स्टेशनवर संगणकावर डेटा एंट्री, टिकटिंग आणि शेड्यूल अपडेट करण्याचे कामही या पदाखाली येते. दैनंदिन कामकाजामध्ये अचूकता, वेळेचे व्यवस्थापन आणि जबाबदारीची जाणीव आवश्यक असते.

हे वाचा

भरती प्रक्रिया कशी असते?

ट्रेन क्लर्कची भरती RRB द्वारे NTPC (Under Graduate) भर्तीमधून केली जाते. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उमेदवारांची CBT (Computer Based Test) परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये General Awareness, Maths आणि Reasoning या विषयांवर प्रश्न असतात. लेखी परीक्षेनंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व मेडिकल टेस्ट घेतली जाते. या पदासाठी टायपिंग टेस्ट आवश्यक नसते, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया सोपी मानली जाते. सध्या ही भरती प्रक्रिया सुरू असून निश्चित तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..