मित्रांनो JEE Main 2026 साठीची नोंदणी प्रक्रिया अधिकृतपणे National Testing Agency (NTA) ने सुरू केली असून अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची संधी आहे. IIT, NIT, IIIT आणि इतर नामांकित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी JEE Main परीक्षा ही पहिली व आवश्यक पायरी मानली जाते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Online अर्ज करणे गरजेचे आहे. नोंदणी प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून अर्ज 27 नोव्हेंबर 2025 च्या रात्री 9 वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत.

ही परीक्षा दोन सत्रांत आयोजित केली जाणार आहे. जानेवारी व एप्रिल 2026. पहिल्या सत्राची परीक्षा 21 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान देशभरातील विविध केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेचा निकाल 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत घोषित होण्याची शक्यता आहे. एप्रिल सत्रासाठी स्वतंत्र नोंदणीची संधी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रात चांगले गुण मिळाले नाहीत त्यांना दुसरी संधी उपलब्ध असेल.

हे वाचा

JEE Main मध्ये तीन पेपर घेतले जातात. Paper-1 हे B.E./B.Tech प्रवेशासाठी असते तर Paper-2A हा B.Arch आणि Paper-2B हा B.Planning प्रवेशासाठी असतो. परीक्षेत वस्तुनिष्ठ (MCQ) आणि संख्यात्मक उत्तर असलेले प्रश्न विचारले जातात आणि चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुणांकन लागू असते. परीक्षा दोन शिफ्टमध्ये, सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते संध्याकाळी 6 — आयोजित केली जाईल.

अर्ज करताना विद्यार्थ्यांनी स्वतःचा किंवा पालकांचा वैध ई-मेल व मोबाईल क्रमांक वापरणे आवश्यक आहे. तसेच एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरेल. परीक्षा 13 भाषांमध्ये, त्यात मराठीचा समावेश असून त्यामुळे विविध राज्यांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या भाषेत परीक्षा देण्याची सुविधा मिळणार आहे. अभियांत्रिकीच्या जगात प्रवेश करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..