मित्रांनो महाराष्ट्र सरकारने यंदा मोठा बदल करत 4थी, 5वी, 7वी आणि 8वी या चारही इयत्तांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही परीक्षा फक्त चौथी आणि सातवीसाठी होत होती, परंतु 2016 पासून ती पाचवी आणि आठवीपर्यंत मर्यादित करण्यात आली होती. मात्र विद्यार्थी संख्या घटल्यामुळे आणि मुलांमध्ये स्पर्धात्मक तयारीची सवय लागावी म्हणून पुन्हा चौथी व सातवीच्या परीक्षा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा एप्रिल–मे 2025 दरम्यान होणार असून नोंदणी प्रक्रिया जानेवारी 2025 मध्ये सुरू होईल.
राज्य परीक्षा परिषदेने चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अधिकृत अभ्यासक्रम जाहीर केला आहे. परीक्षेत चार मुख्य विषय असतील. गणित, प्रथम भाषा (मराठी किंवा इतर), इंग्रजी तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्नपत्रिका बहुपर्यायी (MCQ) प्रकारात असेल. चौथीच्या अभ्यासक्रमात भाषिक आकलन, शब्दसंग्रह, संख्याज्ञान, अपूर्णांक, मापन, भूमिती आणि बुद्धिमत्ता चाचणीत तर्कशक्ती, जलप्रतिबिंब, आरशातील प्रतिमा, वर्गीकरण यांचा समावेश आहे. सातवीमध्ये गणित अधिक सखोल स्वरूपात शिकवले जाईल, ज्यात बीजगणिताची ओळख, सांख्यिकी, भूमिती आणि व्यावहारिक गणित येते. भाषा विषयात आकलन, व्याकरण आणि शब्दप्रभुत्वावर भर दिला आहे.
या परीक्षेची एक मोठी वैशिष्ट्य म्हणजे ती मराठीसह उर्दू, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तेलुगू आणि कन्नड या माध्यमांतही घेतली जाणार आहे. यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी पायाभूत संकल्पनांवर आधारित अभ्यास, रोजचा सराव, प्रश्नपत्रिका सोडवणे आणि वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि शैक्षणिक क्षमता तपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..






