मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने नुकताच विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील गुणवंत तसेच गरजू विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळावी या उद्देशाने शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. याअंतर्गत आता इयत्ता 4 आणि इयत्ता 7 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. पूर्वी 2016 पर्यंत हीच पद्धत होती, परंतु त्यानंतर इयत्ता 5 आणि 8 च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, ग्रामीण भागातील अनेक शाळा फक्त चौथी किंवा सातवीपर्यंत असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना ही संधी मिळत नव्हती. आता हा अडसर दूर होणार आहे.
१६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
या निर्णयामुळे १६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला आहे. आजवर शिष्यवृत्तीची संख्या मर्यादित असल्याने अनेक गुणवंत विद्यार्थी मागे पडत होते. आता सरकारने हा आकडा वाढवण्याचा निर्णय घेतल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळेल. यामध्ये ग्रामीण भागातील तसेच सामाजिक न्याय, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती विभागातील विद्यार्थीही सामील होणार आहेत.
संक्रमण काळ आणि परीक्षा पद्धती
हा बदल प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून लागू होणार आहे. मात्र संक्रमण काळ म्हणून, या वर्षी म्हणजेच 2025 मध्येच, इयत्ता 4, 5, 7 आणि 8 या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे कोणताही विद्यार्थी मधेच वंचित राहणार नाही. पुढे ही परीक्षा फक्त इयत्ता 4 आणि 7 साठीच निश्चित होईल. यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकतेची भावना निर्माण होऊन पुढील शिक्षणात त्यांना अधिक आत्मविश्वास मिळेल.
ग्रामीण विद्यार्थ्यांना न्याय
या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण जिल्हा परिषद किंवा नगरपालिका शाळा बहुतेक वेळा चौथी किंवा सातवीपर्यंतच असतात. याआधी 5 वी किंवा 8 वी मध्ये परीक्षा असल्यामुळे त्या शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी गमवावी लागत होती. आता मात्र ते थेट पात्र ठरणार आहेत.
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..






