महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) माध्यमातून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार असून ६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालेल. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत पूर्ण करण्याची सोय आहे.
नियमित विद्यार्थी त्यांच्या शाळांमार्फत UDISE Plus मधील पेन-आयडी वापरून अर्ज भरतील, तर पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थी, तुरळक विषय घेणारे विद्यार्थी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी, हे सर्व विद्यार्थी www.mahahsscboard.in संकेतस्थळावरून अर्ज भरतील.
शाळांची जबाबदारी महत्त्वाची आहे. अर्ज भरण्यापूर्वी शाळांनी शाळेची प्रोफाइल, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक यांची माहिती योग्यरीत्या भरून मंडळाकडे पाठवावी. अर्ज भरल्यानंतर शाळांमध्ये प्री-लिस्ट उपलब्ध होईल, ज्याची प्रिंट काढून जनरल रजिस्टरनुसार माहिती पडताळून, प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
परीक्षेचे शुल्क शाळांनी RTGS द्वारे भरावे, आणि त्याची पावती, चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री-लिस्ट जमा करण्याचा कालावधी नंतर कळविला जाईल. वेळेत अर्ज न भरल्यास विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यामुळे शाळांमार्फत अर्ज भरण्याची पूर्ण जबाबदारी महत्वाची आहे. MSBSHSE च्या या ऑनलाइन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात सुलभता आणि शाळांना व्यवस्थापनात सोय होईल. सर्व विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी नियम पाळून अर्ज भरणे अत्यंत आवश्यक आहे.
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..





