उच्च शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या पण नोकरी किंवा इतर कारणांमुळे वेळ न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने दूरस्थ व ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. दरवर्षी हजारो विद्यार्थी या माध्यमातून शिक्षण पूर्ण करतात. यंदाही विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून, पात्र उमेदवारांना थेट प्रवेशाची संधी आहे.

हे वाचा

विद्यापीठाच्या ऑनलाइन लर्निंग सेंटरमध्ये अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थी आता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. आतापर्यंत जवळपास ११ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत, तरीही मागील वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

पदवी अभ्यासक्रम: बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी, इंग्रजी), बीकॉम (कॉमर्स, अकाऊंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट), बीएससी (माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र)

पदव्युत्तर अभ्यासक्रम: एम.ए., एम.कॉम., एम.एससी, एमएमएस, एमसीए विविध विषयांसह उपलब्ध आहेत.

ही संधी शिक्षणात पुढे जाण्याची आणि करिअरला गती देण्याची उत्तम संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे, त्यामुळे इच्छुक विद्यार्थी लवकर अर्ज करावा.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..