मित्रांनो महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये बनावट शालार्थ आयडी (Shalarth ID) तयार करून बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या बनावट आयडींच्या माध्यमातून महिनोनमहिने पगार काढण्यात आल्याचं समोर आलं आहे. नागपूर विभागात या घोटाळ्याचं बिंग फुटलं आणि त्यानंतर सरकारने राज्यभर तपासासाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन केलं.
या SIT मध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस महानिरीक्षक मनोज शर्मा आणि शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक हारुण आतार यांचा समावेश करण्यात आला. या पथकाला 3 महिन्यांत सर्व विभागीय उपसंचालक कार्यालयांचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, 3 महिने उलटूनही SIT ने छत्रपती संभाजीनगर विभागात चौकशीला सुरुवात केलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
दरम्यान, विभागीय उपसंचालकांनी शिक्षकांच्या तक्रारींवर सुनावणी घेतली असून 250 पेक्षा अधिक शिक्षकांची कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. या चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला असला तरी पुढील कार्यवाहीबाबत स्पष्टता नाही. शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की SIT अजून प्रत्यक्षात कामाला लागलेली नाही आणि दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. बोगस नियुक्त्यांमुळे केवळ प्रामाणिक शिक्षकांना त्रास होत नाही, तर सरकारी निधीचाही मोठा अपव्यय झाला आहे. शिक्षकांनी पारदर्शक चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर सरकारकडून SIT अहवालाची प्रतीक्षा सुरू आहे.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..






