मित्रांनो Maharashtra Teacher Eligibility Test (TET) 2025 ही परीक्षा यंदा राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. शिक्षक बनण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आल्यानंतर यंदा अर्जदारांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माहितीनुसार, यंदा तब्बल ४ लाख ७५ हजार उमेदवारांनी नोंदणी केली असून, ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे एक लाखांनी अधिक आहे.
या वर्षी परीक्षेच्या शुल्कात वाढ करण्यात आली असून, त्यामुळे सरकारला ५० कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळाला आहे. गेल्या १२ वर्षांत राज्य परीक्षा परिषदेकडून नऊ वेळा टीईटी परीक्षा घेण्यात आल्या, मात्र आजही हजारो टीईटी पात्र उमेदवार बेरोजगार आहेत, हे एक मोठे वास्तव आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्यामुळे फक्त नव्या उमेदवारांनाच नव्हे, तर आधीपासून सेवेत असलेल्या शिक्षकांनाही परीक्षा द्यावी लागत आहे. परिणामी, अर्जदारांची संख्या प्रचंड वाढली आहे.
या वर्षीची टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबर २०२5 रोजी दोन सत्रांमध्ये होणार आहे. सकाळच्या सत्रात इयत्ता १ ते ५ साठी पेपर-१, आणि दुपारच्या सत्रात इयत्ता ६ ते ८ साठी पेपर-२ घेण्यात येईल. अर्ज भरण्याची अंतिम मुदत अतिवृष्टीमुळे ९ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली, ज्यामुळे अनेक उमेदवारांनी शेवटच्या क्षणी नोंदणी केली.
शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे की, शासन टीईटीच्या नावाखाली उमेदवारांकडून कोट्यवधी रुपयांची कमाई करत असताना, बेरोजगार शिक्षकांच्या भावनांशी खेळ करत आहे. राष्ट्रसेवा दलाचे राज्य सचिव नचिकेत कोळपकर यांनी शासनाने तातडीने शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी आणि कायमस्वरूपी टीईटी परीक्षा रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..






