मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी TET Exam 2025 यंदा अत्यंत कडक सुरक्षेच्या वातावरणात पार पडणार आहे. राज्यभरातील मोठ्या प्रमाणातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी या वर्षी तंत्रज्ञानाधिष्ठित उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला आहे. यावर्षी परीक्षेसाठी तब्बल 4.75 लाख विद्यार्थी नोंदणीकृत असून, पेपर 1 साठी 2.03 लाख तर पेपर 2 साठी 2.72 लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

परीक्षा केंद्रात मोबाईल, स्मार्टवॉच, कॅलक्युलेटर आणि कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पूर्णपणे बंदी आहेत. प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्याची मेटल डिटेक्टरने तपासणी, बायोमेट्रिक पडताळणी आणि फेस रेकग्निशन स्कॅनिंग अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे दुसऱ्याकडून परीक्षा देणे किंवा ओळख लपवण्याचे प्रकार पूर्णपणे रोखले जातील.

हे वाचा

यंदा प्रथमच ‘फोटो व्ह्यू’ प्रणाली लागू करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्याचे अर्जातील फोटो आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्याची ओळख एकाच वेळी पडताळली जाणार आहे. तसेच परीक्षा दरम्यान सर्व केंद्रांवर CCTV कॅमेऱ्यांद्वारे सतत निगराणी ठेवली जाणार आहे. राज्यातील 37 जिल्ह्यांमध्ये एकूण 1,423 परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

केंद्रसंचालक आणि राज्य परीक्षा परिषद यांच्यातील संपर्क सुरळीत राहावा म्हणून ‘कनेक्ट व्ह्यू’ हॉटलाइन प्रणाली देखील वापरात आणली आहे. परीक्षेतील पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा टिकवण्यासाठी या सर्व उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकायेथे क्लिक करा

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..