महाराष्ट्रातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 ही परीक्षा दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडणार आहे. राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत ही परीक्षा घेण्यात येते. शिक्षक होण्यासाठी पात्रता मिळवण्यासाठी उमेदवारांनी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

या परीक्षेत दोन पेपर घेतले जातात. पेपर १ हा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी (प्राथमिक शिक्षक) तर पेपर २ हा इयत्ता सहावी ते आठवीसाठी (उच्च प्राथमिक शिक्षक) घेण्यात येतो. राज्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे आणि सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित तसेच कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी ही पात्रता परीक्षा बंधनकारक आहे.

हे वाचा

अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होईल आणि उमेदवारांना ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज करता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर पार पडणार आहे. अर्ज करताना उमेदवारांनी योग्य माहिती भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण चुकीची माहिती भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रवेशपत्र उमेदवारांना १० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत डाउनलोड करता येईल. परीक्षा दिनांक २३ नोव्हेंबरला असून पेपर १ सकाळी १०:३० ते दुपारी १:०० आणि पेपर २ दुपारी २:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत होणार आहेत.

२०१८ व २०१९ च्या टीईटी गैरप्रकार प्रकरणात सामील असलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची परवानगी नाही. तसेच खोटी माहिती भरून अर्ज करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. टीईटी परीक्षा २०२५ ही शिक्षक होण्याची सुवर्णसंधी आहे. योग्य तयारी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर उमेदवार निश्चितपणे यश मिळवू शकतात.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकायेथे क्लिक करा

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..