मित्रांनो देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. ईएसआयसी (ESIC) वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण १३८ नवीन एमबीबीएस (MBBS) जागा वाढविण्यात आल्या आहेत. या नव्या जागांचा समावेश आता तिसऱ्या फेरीच्या (Round 3) कौन्सिलिंग प्रक्रियेत करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना अधिक प्रवेश संधी उपलब्ध होणार आहे.
डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस (DGHS) अंतर्गत मेडिकल कौन्सिलिंग कमिटी (MCC) ने तातडीची सूचना जारी केली आहे. ३ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासह सहा राज्यांतील ईएसआयसी महाविद्यालयांमध्ये या जागा वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना “Choice Filling” प्रक्रियेद्वारे या नव्या जागांसाठी अर्ज करता येईल.
दुसऱ्या फेरीअखेर अनेक जागा अद्याप रिक्त होत्या. त्यात एमबीबीएसच्या ६३६ आणि बीडीएसच्या ८९१ जागा रिक्त असल्याचे नोंदवले गेले आहे. यात शासकीय महाविद्यालयांतील १६८ आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील ४६८ जागांचा समावेश आहे. तिसऱ्या फेरीत या रिक्त आणि वाढीव जागांचा समावेश होणार आहे.
राज्य सीईटी सेल (State CET Cell Maharashtra) ने तिसऱ्या फेरीचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. नोंदणी आणि फी भरण्यासाठी ६ ते ८ ऑक्टोबर, तर सीट मॅट्रिक्स आणि गुणवत्ता यादी ९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. प्राधान्यक्रम फॉर्म भरण्यासाठी १० ते १२ ऑक्टोबर मुदत देण्यात आली असून, निवड यादी १५ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी उत्सुक विद्यार्थ्यांना मोठी दिलासा देणारी संधी मिळाली आहे. आता अधिक जागा आणि पर्यायांमुळे विद्यार्थ्यांचा एमबीबीएसचा स्वप्नवत प्रवास आणखी जवळ येणार आहे.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..





