मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) उमेदवारांसाठी मोठा आणि महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. याअंतर्गत आता उमेदवारांना अर्ज सादर करतानाच सर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून पडताळणीसाठी सादर करावी लागणार आहेत. या नवीन प्रणालीमुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार आहे.

पूर्वी MPSC भरती प्रक्रियेत उमेदवारांना फक्त पात्रतेचा दावा करून अर्ज करता येत असे. परीक्षेनंतर आणि मुलाखतीनंतरच कागदपत्र पडताळणी केली जायची. यामुळे काहीवेळा खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवण्याचे प्रकार समोर येत आणि भरती प्रक्रिया वादात अडकत असे. मात्र, आता अर्ज करतानाच कागदपत्र पडताळणी झाल्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पूर्णविराम मिळणार आहे.

हे वाचा

नवीन नियमानुसार उमेदवाराने आपली पात्रता, आरक्षणाचा दावा आणि संबंधित प्रमाणपत्रे अर्ज भरतानाच अपलोड करावी लागतील. जर एखादे प्रमाणपत्र चुकीचे किंवा अपूर्ण असेल, तर उमेदवाराला एकदाच सुधारण्याची संधी दिली जाईल. आयोगाकडून एसएमएस किंवा ई-मेलद्वारे सूचना दिल्यानंतर ७ दिवसांच्या आत वैध कागदपत्र सादर करणे बंधनकारक राहील. अन्यथा अर्ज अपात्र ठरेल.

आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना (जसे की भूकंपग्रस्त, खेळाडू, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, दिव्यांग, माजी सैनिक इ.) अर्ज करतानाच त्यांच्या दाव्यांचे पुरावे अपलोड करावे लागतील. यामुळे खऱ्या पात्र उमेदवारांना न्याय मिळेल आणि निवड प्रक्रिया अधिक सुस्पष्ट बनेल.

या निर्णयामुळे MPSC भरती प्रक्रिया फक्त वेगवानच नव्हे तर विश्वासार्ह आणि पारदर्शक बनेल. विद्यार्थ्यांसाठी हा बदल अत्यंत सकारात्मक असून, आता त्यांना निवडीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार नाही. ही नवी पद्धत शासन सेवेत प्रवेशासाठी एक निर्णायक पाऊल ठरेल.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..