मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. मात्र राज्यभरातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीमुळे या परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट आले आहे. लाखो उमेदवार या परीक्षेसाठी झटत आहेत. विशेष म्हणजे यंदा एमपीएससीने अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्यात आली असून, हा बदल लागू झाल्यानंतरची ही पहिलीच परीक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहासोबतच गोंधळही आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि नागपूर परिसरात गेल्या काही दिवसांत आलेल्या पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. वाचनालये बंद असल्याने अभ्यासाला अडथळे निर्माण झाले आहेत. अनेकांचे अभ्यास साहित्यही वाहून गेले आहे. त्यातच रस्ते आणि वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे अवघड झाले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की अशा परिस्थितीत परीक्षा झाल्यास समान संधीचा भंग होईल.

हे वाचा

एमपीएससीमधील काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी स्पष्ट केले की, आयोग स्वतःहून परीक्षेची तारीख पुढे ढकलू शकत नाही. यासाठी राज्य सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकृत विनंती केली तरच परीक्षेची तारीख बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे लक्ष राज्य सरकारकडे लागले आहे.

MPSC परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट मानली जाते. पण सध्याच्या पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी गंभीर आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता सरकार आणि आयोगाच्या पुढील निर्णयावर खिळल्या आहेत. ही परीक्षा वेळेत होणार का पुढे ढकलली जाणार, याकडे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..