मित्रांनो MPSC Group B Exam Date 2025 संदर्भात राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. कारण येत्या २१ डिसेंबर 2025 रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे, आणि त्याच दिवशी MPSC गट ब पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक निकालामुळे प्रशासनावर मोठा ताण येणार असल्याने परीक्षा सुरळीत पार पाडण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यामुळे लाखो उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणूक निकालाच्या दिवशी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, वाहतूक आणि मनुष्यबळ यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या सर्व कर्मचारीवर्गावर निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी असल्याने परीक्षा केंद्रांची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थापन आणि समन्वयात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी MPSC कडे परीक्षा तारखेवर स्पष्टता देण्याची मागणी केली होती.
विद्यार्थ्यांच्या या मागणीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने पावले उचलली आहेत. आयोगाने राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांशी संपर्क साधून परीक्षा आयोजित करण्याची क्षमता तपासायला सुरुवात केली आहे. काही जिल्ह्यांनी परीक्षा आयोजित करण्यासाठी विशेष कसरत करावी लागेल असे सांगितले आहे, तर एका जिल्ह्याने परीक्षा घेणे कठीण असल्याचे कळवले आहे. नियमांनुसार, जर एकही जिल्हा प्रशासन परीक्षा घेण्यास सक्षम नसल्याचे सांगते, तर परीक्षेची तारीख बदलावी लागते. त्यामुळे तारीख बदलण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ४ किंवा ५ डिसेंबर 2025 पर्यंत याबद्दल अधिकृत परिपत्रक काढले जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासाचे नियोजन करता येईल आणि मानसिक तयारीही सुलभ होईल.
सतारा, पालघर, रत्नागिरी, नंदुरबार, बीड, धाराशिव, वर्धा, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया अशा अनेक जिल्ह्यांमध्ये नगरपालिका असल्याने प्रशासनावर दुहेरी ताण येणार आहे. त्यामुळे परीक्षेची तारीख बदलण्याची शक्यता अधिक प्रबळ मानली जात आहे.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..





