महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी ही एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २०२६ सालातील विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक (Tentative Schedule) जाहीर केले आहे. या वेळापत्रकात राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, गट-ब आणि गट-क अशा महत्त्वाच्या परीक्षा समाविष्ट आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना आपला अभ्यास आणि नियोजन अधिक ठोसपणे करता येणार आहे.

एमपीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आलेले हे वेळापत्रक शासनाकडून मागणीपत्र वेळेत प्राप्त होईल या गृहितकावर आधारित आहे. म्हणजेच या तारखा अंदाजित आहेत आणि काही परीक्षांच्या दिनांकांमध्ये पुढे बदल होण्याची शक्यता आहे. तथापि, हे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

हे वाचा

जाहीर वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५ ही ५ ते ९ मे २०२६ दरम्यान होणार असून तिचा निकाल ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केला जाईल. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५, १६ मे रोजी होणार आहेत, तर त्यांचा निकालदेखील ऑगस्टमध्ये जाहीर होईल. त्याचबरोबर अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा १७ मे रोजी, तर गट-क सेवा मुख्य परीक्षा ७ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.

राज्यसेवा (State Service) मुख्य परीक्षा ३ ते २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान घेण्यात येईल आणि तिचा निकाल ऑगस्ट २०२७ मध्ये लागेल. याच काळात विद्युत आणि यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा १५ नोव्हेंबर रोजी, तसेच कृषी व स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १५ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. त्यांचे निकाल अनुक्रमे फेब्रुवारी व मार्च २०२७ मध्ये जाहीर होतील.

तसेच अन्न व औषध प्रशासन सेवा आणि निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यांचे निकाल मार्च २०२७ मध्ये प्रसिद्ध केले जातील. वर्षअखेर, म्हणजेच २६ ते ३० डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२६ घेण्यात येईल आणि निकाल एप्रिल २०२७ मध्ये अपेक्षित आहे.

हे वाचा

पूर्व परीक्षांबाबत बोलायचे झाले तर गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १४ जून २०२६, तर गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १२ जुलै २०२६ रोजी होणार आहेत. या दोन्ही परीक्षांचे निकाल अनुक्रमे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जाहीर करण्यात येतील.

MPSC ने स्पष्ट केले आहे की हे वेळापत्रक फक्त मार्गदर्शक स्वरूपाचे आहे आणि अंतिम तारखा अधिकृत अधिसूचनेतूनच निश्चित होतील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in वर नियमितपणे भेट देत अद्ययावत माहिती तपासावी.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..