मित्रांनो कल्पना करा… तुम्ही MBBS चा प्रवास पूर्ण करत आहात आणि तुमच्या पुढे दोन मोठे दरवाजे उघडे आहेत. एक पारंपरिक NEET PG आणि दुसरा नवा, चर्चेत असलेला आणि डॉक्टरांचा भविष्य बदलणारा NExT. दोन्ही परीक्षा तुमच्या मेडिकल करिअरचं direction ठरवणार, पण दोन्हींचा मार्ग आणि आव्हानं पूर्णपणे वेगळी. एक थेट पुस्तकांमधून कॉन्सेप्ट आणि थिअरी विचारते, तर दुसरी तुमचे खरे डॉक्टर असण्याचे कौशल्य म्हणजेच प्रॅक्टिकल आणि क्लिनिकल स्किल्स live तपासणार. म्हणून “NEET की NExT?” हा प्रश्न आता फक्त एक पर्याय नाही तर प्रत्येक मेडिकल स्टुडंटसाठी भविष्यातील करिअरचा game-changer आहे.

हे वाचा

NEET PG vs NExT: कोणती परीक्षा अधिक कठीण? मेडिकल विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन

NEET PG म्हणजे काय?

NEET PG ही राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा आहे जी डॉक्टरांना MD, MS आणि इतर PG मेडिकल कोर्सेसमध्ये प्रवेश मिळवून देते. ही परीक्षा MCQ आधारित असून विद्यार्थ्यांच्या थिअरी नॉलेज आणि विषयातील कॉन्सेप्ट समजण्याची क्षमता तपासते. सध्या दरवर्षी एकदा ही परीक्षा NEBMS द्वारे घेतली जाते.

NExT म्हणजे काय?

NExT (National Exit Test) ही सरकारची प्रस्तावित परीक्षा आहे जी MBBS फाइनल ईयर परीक्षा, डॉक्टर्सचा लाइसेंसिंग टेस्ट आणि PG प्रवेश परीक्षा हे तीन उद्देश एकत्र पूर्ण करणार आहे. या परीक्षेत थिअरीसोबतच क्लिनिकल आणि प्रॅक्टिकल स्किल्सलाही मोठे महत्त्व असेल. Step-1 थिअरी तर Step-2 प्रॅक्टिकल असे दोन टप्पे असतील.

पात्रतेत काय फरक?

घटकNEET PGNExT
परीक्षेचा उद्देशPG मेडिकल प्रवेश परीक्षालायसेंसिंग + PG प्रवेश परीक्षा
परीक्षा पद्धतMCQ आधारितStep 1 – Theory (MCQ)
Step 2 – Practical/Clinical
परीक्षेचे टप्पेएकच परीक्षादोन स्टेप्स (Step 1 & Step 2)
पात्रताMBBS + इंटर्नशिप पूर्णStep 1: MBBS Final Year
Step 2: Step 1 पास + इंटर्नशिप पूर्ण
उद्दिष्ट फोकसथिअरी व रँकिंगथिअरी + क्लिनिकल कौशल्ये
कठीण पातळीथिअरी ओरिएंटेडथिअरी + प्रॅक्टिकल मिळून जास्त कठीण
प्रयत्न मर्यादामर्यादा नाहीमर्यादा नाही (लायसेंस मिळवण्यासाठी पास होणे आवश्यक)
संचालन संस्थाNBEMSNMC / AIIMS (संभाव्यता)
दरवर्षी परीक्षा१ वेळसंभाव्यतः २ वेळा (Step-wise)

NEET PG साठी उमेदवाराकडे MBBS डिग्री असणे आणि इंटर्नशिप पूर्ण करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, NExT Step-1 साठी MBBS अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी पात्र असतील, तर Step-2 देण्यासाठी Step-1 पास करणे आणि इंटर्नशिप पूर्ण करणे आवश्यक राहील. दोन्ही परीक्षांमध्ये वयमर्यादा किंवा प्रयत्नांची मर्यादा नाही.

हे वाचा

परीक्षा पद्धतीत फरक

NEET PG फक्त MCQ आधारित पेपर आहे ज्यामध्ये मुख्य भर थिअरी, डायग्नोसिस आणि क्लिनिकल बेसिक्सवर असतो. तर NExT मध्ये थिअरी सोबतच प्रॅक्टिकल, क्लिनिकल एक्स्पोजर आणि पेशंट हँडलिंग स्किल्स तपासल्या जातील. त्यामुळे NExT परीक्षा अधिक practically oriented असेल.

काय कठीण?

NEET PG ची तयारी पद्धत निश्चित आणि अभ्यास स्रोत उपलब्ध असल्याने तयारी तुलनेने सोपी वाटते. मात्र, NExT मध्ये थिअरीसोबत प्रॅक्टिकल आणि क्लिनिकल मूल्यांकन असेल, त्यामुळे तयारी अधिक विस्तृत आणि आव्हानात्मक होणार आहे. त्यामुळे भविष्यात NExT तुलनेने कठीण मानली जाऊ शकते.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..